शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

गावाकडे परतणारे मजूर व गरजूंसाठी सरसावले जागोजागी मदतीचे हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 12:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : देशात लॉकडाऊनमुळे परराज्यातील मजूर गावाकडे परतू लागले आहेत. प्रवासी वाहतूक सेवा बंद असल्याने हे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : देशात लॉकडाऊनमुळे परराज्यातील मजूर गावाकडे परतू लागले आहेत. प्रवासी वाहतूक सेवा बंद असल्याने हे मजूर पायपीट करीत रवाना होत आहे. जिल्ह्यातील विविध गावात या मजुरांना व स्थानिक गरजू कुटुंबांना जेवणावसह जीवनावश्यक वस्तू देण्यासाठी मदतीचे हात सरसावले आहेत.तळोद्यात जीवनावश्यकवस्तूंचे वाटपलॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब जनतेची चूल पेटावी म्हणून दावलशा बाबा महिला उन्नती मंडळ संचलित कल्याणी बालसदन अनाथालयातर्फे २०० गरजु कुटुंबाना जीवनावश्यक वस्तू, गव्हाचे पीठ, तांदूळ व वांगी यांचे वाटप पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर पाकळे, अध्यक्षा वंदना तोरवणे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. कोरोना विषाणूचा संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने सर्वत्र संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीत तळोदा शहरातील ज्यांचे रोजच्या कमाईवर उदरनिर्वाह चालतो व हाताला काम तर पोटाला भाकरी अशी परिस्थितीच्या व जीवनावश्यक वस्तुविना बेहाल झालेल्या मोलमजुरी करणाºया कुटुंबियांचे हाल कमी व्हावेत व त्यांना दोन वेळचे जेवण मिळावे म्हणून दावलशा बाबा महिला उन्नती मंडळाच्या तळोदा येथील कल्याणी बालसदन व अनाथालयातर्फे अध्यक्षा वंदना तोरवणे यांनी जिल्हा परिषद शाळेमागील वस्तीतील गरजू कुटुंबाना जीवनावश्यक वस्तू असलेल्या गव्हाचे पीठ, तांदूळ व भाजीपाला, वांगी यांचे वाटप बालसदन येथे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण पो उप निरीक्षक ज्ञानेश्वर पाकळे यांचे हस्ते केले. याचा लाभ २०० कुटुंबियांनी घेतला. या वेळी पत्रकार उल्हास मगरे, अधीक्षिका शर्मिला माळी, अधिक्षक संदीप भामरे, अभिजित मगरे यांनी सहकार्य केले.गोगापूरला परराज्यातीलमजुरांना जेवणकोरोनाच्या भितीने गुजरात राज्यातील सोनगडहून मध्यप्रदेशात आपापल्या गावाकडे पायपीट करीत जाणाºया मजुरांना गोगापूर, ता.शहादा येथील शाळेत भोजन देण्यात आले. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशभरात लॉकडाऊन असल्याने अनेक ठिकाणी मजूर अडकले आहेत. स्वत: जवळचा पैसा अडका संपल्याने आता हे मजूर जीवावर उदार होऊन गावाकडे निघाले आहेत. सोनगड (गुजरात) व अलिराजपूर (मध्यप्रदेश ) येथे काही मजूर कामाला गेले होते. लॉकडाऊनमुळे काम बंद झाल्याने आणि जवळील पैसेही संपल्याने उपासमारीची वेय येऊ लागल्यामुळे हे मजूर सोनगडहून पायीच गावाकडे निघाले. शुक्रवारी सकाळी निघालेले हे मजूर दिवसभर व रात्रभर पायपीट करीत शनिवारी सकाळी गोगापूर, ता.शहादा येथे पोहचले. रात्रंदिवस चालल्याने थकलेल्या या मजुरांनी गोगापुरच्या माध्यमिक विद्यालयाजवळील झाडांखाली विश्रांतीसाठी आसरा घेतला. एकूण ३३ मजुरांमध्ये १३ मुले व बायांचाही समावेश होता. शाळेजवळ आसरा घेतलेल्या या सर्व मजुरांची ग्रामस्थांनी आस्थेने चौकशी केली असता त्यांनी सोनगडहून पायी चालत आल्याचे व अलिराजपूरला जात असल्याचे सांगितले. ग्रामस्थांनी त्यांची अडचण समजून घेत जेवणाची व्यवस्था केली. या वेळी मुख्याध्यापक संघाचे तालुका अध्यक्ष व गोगापूर शाळेचे मुख्याध्यापक जयदेव पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वांना शाळेच्या आवारात जेऊ घातले. रमाशंकर माळी यांनी कैलास गोयल यांना सांगून त्यांच्या पुढील प्रवासाची सोय उपलब्ध करून दिली.विसरवाडीत जेवणासहरेशनचेही वाटपनवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील हिंदू एकता समिती व विसरवाडी ग्रामस्थांतर्फे लॉकडाऊनमुळे आपल्या गावी परतणाºया नागरिकांना विसरवाडी येथे पिण्याचे शुद्ध पाणी व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे परराज्यातून मजुरीसाठी गेलेले मजूर आपल्या मुलाबाळांसह पायपीट करीत प्रसंगी मिळेल त्या वाहनाने आपल्या गावी निघाले आहेत. रस्त्यामध्ये सर्व हॉटेल बंद असल्यामुळे त्यांची उपासमार होत आहे. विसरवाडी-नंदुरबार रस्त्यावरील विजय आॅइल मिलसमोर त्यांच्या जेवणाची सोय केली जात आहे. रस्त्याने जाणाºया वाहनचालकांना विनवण्या करून या मजुरांना मिळेल तिथपर्यंत प्रवास करण्याची व्यवस्थाही केली जात आहे. विसरवाडी ग्रामस्थांकडून मजुरांसाठी गहू, तांदूळ, साखर, तेल व इतर आवश्यक वस्तू जमा केल्या जात आहेत. गरजवंताला जेवणासह रेशनही दिले जात आहे. विसरवाडी येथील समाजसेवेची जाणीव असलेले युवक एकत्र येऊन उपाशीपोटी पायी चालणाºया व थकलेल्यांसाठी अन्नदानाची सोय करीत असल्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.