शहरं
Join us  
Trending Stories
1
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
2
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
3
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
4
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
5
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
6
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
7
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
8
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
9
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
10
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
11
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
12
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
13
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
14
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
15
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
16
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
17
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
18
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
19
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
20
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT

पद्मावत चित्रपटासाठी दाऊदकडून अर्थपुरवठा : नंदुरबार येथे आमदार राजासिंह ठाकूर यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 12:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :     पद्मावती चित्रपटामधून इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आले आहे. यामध्ये पद्मावती राणीला नाचताना दाखवण्यात आले. यामध्ये केवळ संजय लिला भन्साळी यांचा हात नाही तर पद्मावती चित्रपटाला दाऊदसारख्या आतंकवाद्यांकडून अर्थपुरवठा झाला आहे, असा गंभीर आरोप प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्रीराम युवा सेनेचे अध्यक्ष आमदार राजासिंह ठाकूर यांनी येथे केला.येथील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :     पद्मावती चित्रपटामधून इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आले आहे. यामध्ये पद्मावती राणीला नाचताना दाखवण्यात आले. यामध्ये केवळ संजय लिला भन्साळी यांचा हात नाही तर पद्मावती चित्रपटाला दाऊदसारख्या आतंकवाद्यांकडून अर्थपुरवठा झाला आहे, असा गंभीर आरोप प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्रीराम युवा सेनेचे अध्यक्ष आमदार राजासिंह ठाकूर यांनी येथे केला.येथील जुन्या पोलीस मैदानावर हिंदू जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या हिंदू धर्मजागृती सभेत प्रमुख वक्ते म्हणून बोलताना आमदार ठाकूर यांनी आरोप केला. शंखनादाने सभेला प्रारंभ झाला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हार अर्पण केला. त्यानंतर वेदमूर्ती योगेश गव्हाले, भूषण जोशी यांनी वेदमंत्र पठण केले.  या सभेला सनातनच्या संत पूज्य केवळबाई पाटील यांच्यासह आमदार डॉ.विजयकुमार गावीत, भाजपचे ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, नंदुरबारचे नगरसेवक आनंदा माळी, तळोद्याचे नगरसेवक रवी महाजन, मोठा मारुती मंदिराचे अध्यक्ष अशोक चौधरी, गोरक्षक केतन रघुवंशी, नगरसेवक चारूदत्त कळवणकर, गौरव चौधरी, पवन अग्रवाल,  कमल ठाकूर उपस्थित  होते. या सभेला सहा हजारांहून  अधिक हिंदू उपस्थित होते. यामध्ये युवकांचा सहभाग मोठय़ा प्रमाणात होता.       या वेळी आमदार राजासिंह ठाकूर म्हणाले, यापूर्वी संजय भन्साळी यांनी काढलेल्या ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटात बाजीरावाला रंगेल दाखवण्याचा प्रय} केला. अशाप्रकारे चित्रपट काढून हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा संजय भन्साळी यांचा प्रय} आहे.  पद्मावती केवळ राजपूतांची राणी नाही तर समस्त          हिंदू समाजाची राणी आहे. ‘द विंची कोड’ या चित्रपटात ‘जीझस नाही’ असे दाखवण्यात आले होते. हा चित्रपट संपूर्ण जगात प्रदर्शित झाला. भारतात मात्र या चित्रपटावर बंदी घालण्यात आली. ‘विश्वरुपम’ या चित्रपटावर तामिळनाडूमध्ये बंदी घालण्यात आली होती. ‘इंदू सरकार’ चित्रपटाच्या विरोधात काँग्रेसवाल्यांनी देशभर आंदोलने केली. हे सर्व  चालते. मात्र हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान होतो त्याची दखल कुणी घेत नाही. केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळावरही (सेन्सॉर बोर्ड)                 त्यांनी आरोप केले. राज्यात गोहत्या बंदी कायदा असूनही गोमातेच्या हत्या होत आहेत. याकडे सर्वोच्च न्यायालयाने लक्ष घालावे, असे मत आमदार राजासिंह ठाकूर यांनी व्यक्त केले.नंदुरबार नव्हे, नंदनगरीयापुढे जिल्ह्याला नंदुरबार नव्हे, तर नंदनगरी या नावाने ओळखले जावे. सर्वानी आजपासूनच या जिल्ह्याला नंदनगरी असे म्हणावे, असे आवाहनही आमदार राजासिंह यांनी केले.स्वसंरक्षण प्रशिक्षणरणरागिणी शाखेच्या क्षिप्रा जुवेकर म्हणाल्या, की दुष्टांचा संहार करणारी दुर्गा, चंडी, काली या हिंदू धर्मातील देवींचा आदर्श आपल्यासमोर असताना तरूणींनी अबला नव्हे; तर सबला बनून सामना करून आपले शौर्य गाजवले पाहिजे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील पाच हजारांहून अधिक मुली यावर्षी बेपत्ता झाल्याची माहिती उघड केली आहे. या मुली नेमक्या गेल्या कुठे? स्वत:चा आत्मसन्मान जपण्यासाठी स्वसंरक्षण वर्गात प्रशिक्षण घ्यावे. रागेश्री देशपांडे म्हणाल्या की, विदेशातून चर्चला कोटय़ावधी रूपये पाठविले जातात. त्यातूनच नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी भागात धर्मातर केले जात आहे. धर्मातर रोखण्यासाठी संपूर्ण देशात धर्मातर बंदी कायदा लागू करायला हवा. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदूंची धर्माविषयीची जागरूकता अल्प पडते आहे. अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांचा अवमान झाल्यास त्यांच्या भावनांचा विचार होतो. मात्र, हिंदूंच्या श्रद्धास्थानांच्या अवमानाच्या वेळी व्यक्ती स्वातंत्र्य म्हटले जाते. लोकशाहीत शिक्षण, आरोग्य, न्यायालय कोणतेच क्षेत्र भ्रष्टाचारापासून सुटलेले नाही. सामान्यांचे जगणे कठीण झाले    आहे.या वेळी सनातन संस्थेचे सद्गुरू नंदकुमार जाधव यांनीही मार्गदर्शन केले. हिंदू जनजागृती समितीच्या उल्लेखनिय कार्याचा आढावा डॉ.नरेंद्र पाटील यांनी  मांडला. सूत्रसंचालन प्रशांत जुवेकर यांनी केले.