शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
6
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
7
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
8
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
9
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
10
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
11
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
12
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
13
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
14
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
15
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
16
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
17
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
18
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
19
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
20
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान

अखेर शेवाळी ते नेत्रंग महामार्ग दुरूस्तीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 13:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दीर्घ काळापासून खड्ड्यांत गेलेल्या शेवाळी ते नेत्रंग महामार्गाची दुरूस्ती सुरू करण्यात आली आहे. लोकमतने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दीर्घ काळापासून खड्ड्यांत गेलेल्या शेवाळी ते नेत्रंग महामार्गाची दुरूस्ती सुरू करण्यात आली आहे. लोकमतने केलेल्या पाठपुराव्यानंतर महामार्ग विभागाने मार्गाची दुरूस्ती सुरू केली असून नंदुरबार शहरातील करण चाैफुली ते अक्कलकुवा तालुक्यात गुजरात हद्दीपर्यंत काम सुरू झाले आहे.        ७५३ बी अर्थात शेवाळी ते नेत्रंग महामार्गाची दुरवस्था या मार्गाने प्रवास करणार्यांना अपघातांच्या खाईत लोटत होती. याबाबत राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्यासह अनेकांनी आंदोलने करुनही बांधकाम विभाग दाद देत नव्हता. केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडून महामार्गाची देखभाल आणि दुरूस्ती करण्यासाठी गेल्या वर्षात ३७ कोटी रूपये मंजूर करुनही काम लांबले होते. कधी कोरोना तर कधी पावसाळ्याचे कारण देत कामाला ब्रेक दिला होता. दरम्यान या काळात नंदुरबार शहरातील करण चाैफुली ते तळोदा जवळ हाताेडा पूल ह्या अंतरात मोठमोठे खड्डे पडून वाहतूक करणे जिकिरीचे झाले होते. याबाबत नागरीकांनी आंदोलन केली होती. लोकमतने सातत्याने वृत्त मालिका करुन संबधित कामाची स्थिती समोर आणली होती. या पाठपुराव्याला अखेर यश आले असून सोमवारी सकाळपासून करण चाैफुलीपासून डांबरीकरण करुन खड्डे भरण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. यामुळे नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे. 

तीन टप्प्यात होणार दुरूस्तीचे काम जिल्ह्यातून १११ किलोमीटर अंतर कापणार्या महामार्गाची नंदुरबार ते अक्कलकुवा तालुक्यातील गुजरात हद्दीपर्यंत दुरूस्तीचे काम सोमवारपासून हाती घेण्यात आले आहे. यांतर्गत तीन ठेकेदार नियुक्त करुन काम सुरू करण्यात आले आहे. नंदुरबार ते हातोडा पूल दरम्यान ६ कोटी, तळोदा ते अक्कलकुवा अंतरासाठी १३ कोटी तर अक्कलकुवा ते गुजरात हद्दीसाठी १० कोटी रूपयांचा खर्च करण्यात येणार आहे. यांतर्गत रस्त्यावर खडीकरण व डांबरीकरण करण्याचे आदेश देण्यात आले आहे. हे काम दीर्घकाळ टिकेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.