शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
4
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
5
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
6
संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
7
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
8
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
9
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
10
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
11
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
12
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
13
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
14
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
15
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
16
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
17
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
18
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
19
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
20
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?

अखेर १०० वर्षापूर्वीचे जुने ‘अ‍ॅडन्सोनिया’चे झाड कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबार शासकीय विश्रामगृहात बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांना आकर्षित करणारे पुरातन अ‍ॅडन्सोनियाचे वृक्ष अखेर बुधवारी रात्री ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार शासकीय विश्रामगृहात बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांना आकर्षित करणारे पुरातन अ‍ॅडन्सोनियाचे वृक्ष अखेर बुधवारी रात्री निसर्गवादळाच्या तडाख्यात कोसळले. त्यामुळे या पुरातन वृक्षाचे अस्तित्व आता संपुष्टात आले आहे.नंदुरबार शासकीय विश्रामगृहाच्या आवारात प्रवेशद्वारासमोरच येणाºया पाहुण्यांचे भव्य पुरातन वृक्ष स्वागत करत होते. अ‍ॅडन्सोनिया असे या वृक्षाचे नाव होते. त्याला भारतीय भाषेत गोरख चिंच म्हणून ओळखले जाते. या झाडाची उंची साधारणत: २० मीटर पर्यंत तर व्यास १० मीटर होता. हे वृक्ष विश्रामगृहाच्या बांधकामापूर्वी म्हणजे जवळपास १०० वर्षांपूर्वी तेथे लावण्यात आले होते. पुरातन वृक्ष असल्याने बांधकाम विभागानेही या वृक्षावर त्याची माहिती त्यावर दिली होती. हे झाड औषध म्हणूनही गुणकारी मानले जायचे. त्या झाडाची साल व फळाचा गर तापावर, हिवतापावर, पोटाचे विकार, मुत्रपिंडाचे विकार, रक्तदोष यावर गुणकारी असल्याचे त्यावर लिहिले होते. येणाºया जाणाºया प्रत्येक पाहुण्याला ते आकर्षित करीत होते. परंतु बुधवारी निसर्ग वादळाच्या काही प्रमाणात पडसात जिल्ह्यातही होते. रात्री साडेदहा ते ११ वाजेच्या दरम्यान वाºयाचा वेग जास्त होता. या वाºयातच हे वृक्ष उन्मळून पडले. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. पण वृक्षा समोरच्या उद्यानाच्या वॉल कम्पाऊंडच्या भिंतीला मात्र त्याचे नुकसान झाले. हे वृक्ष कोसळल्याने शहरातील पुरातन वृक्षाचे व बाहेरून येणाºया पाहुण्यांना आकर्षित करणाºया या वृक्षाचे अस्तित्व संपल्याचे मानले जाते.लहान शहादा : निसर्ग वादळासंदर्भात हवामान खात्याने आगाऊ सूचना दिल्याने भितीपोटी ग्रामीण भागातील जनतेने रात्र जागून काढली. लहान शहादेसह परिसरातील अनेक गावातील लोकांनी रात्रीचे जागरण केले. दरम्यान वादळाचा धोका टळल्याने लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. परिसरात बुधवारी दुपारपासूनच जोरदार वाºयासह पाऊस झाला. त्यामुळे रस्त्यांवर पाणी साचले होते. कोळदा-खेतिया रस्त्याचे काम सुरू असून, काही ठिकाणी केवळ खोदकाम करण्यात आले आहे. कोळदा व लहान शहादा गावाजवळ फरशीच्या कामासाठी खड्डे खोदल्याने तेथे पाणी भरले होते. हे पाणी गावांमध्येही शिरले. त्यामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते. वाहनधारकांसाठीही हा रस्ता त्रासदायक ठरल्याने गुरूवारी अनेक दुचाकी वाहनधारक या मार्गावर घसरल्याने अपघाताच्या घटना घडल्या. दरम्यान गुरूवारी दुपारनंतरही परिसरात पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने लोकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले.