शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

गट,गण रचनेचा आराखडा अंतिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 11:46 IST

20 ऑगस्टला जाहीर होणार : 27 ऑगस्टला आरक्षण सोडत, वाढीव गटाकडे लक्ष

नंदुरबार : जिल्हा परिषदेचा नवापूर तालुक्यात वाढलेला गट कोणता राहतो याकडे लक्ष लागून आहे. प्रारूप गट, गण रणचनेचा प्रारूप आराखडा सोमवारी विभागीय आयुक्तांना पाठविण्यात येणार आहे. त्यावर 20 ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त शिक्कामोर्तब करणार आहेत. प्रारूप आराखडा व गट, गणांचे आरक्षण याकडे आता जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत निवडणुकीच्या पाश्र्वभुमीवर राजकीय पक्षांमध्ये सामसूम असल्याचे चित्र आहे.जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रक्रियेला प्रशासकीय स्तरावर सुरूवात झाली आहे. जिल्हा प्रशासनाने प्रारूप गट, गण रचनेचा आराखडा प्राथमिक स्तरावर पुर्ण केला आहे. त्याचा अहवाल सोमवारी विभागीय आयुक्तांना पाठविण्यात येणार आहे. दरम्यान, यंदा एक गट वाढणार असल्यामुळे हा गट कुठल्या तालुक्यात राहील याकडे आता लक्ष लागून आहे.56 गट व 112 गणांची रचनाप्रशासनाने प्राथमिक स्वरूपात 56 गट व 112 गणांची प्रारूप रचना तयार केली आहे. गेल्या पंचवार्षीकला 55 गट व 110 गण होते. यंदा गेल्या पंचवार्षीकच्या तुलनेत गणांची संख्या अक्कलकुवा व नंदुरबार वगळता सर्वच तालुक्यात कमी, जास्त झाली आहे.अक्कलकुवा तालुक्यात गेल्या पंचवार्षीकला 10 गट व 20 गण होते. यंदा गणांची व गटाचीही संख्या तेवढीच राहणार आहे.  धडगाव तालुक्यात गेल्या पंचवार्षीकला    आठ गट व 16 गण होते. यंदा सात   गट व 14 गण राहणार आहेत.    तळोदा तालुक्यात गेल्यावर्षी पाच  गट व 10 गण होते यंदा गट व   गणांची संख्या तेवढीच राहणार   आहे. शहादा तालुक्यात गेल्यावर्षी 13 गट व 26 गण होते यंदा 14 गट व 28 गण राहणार आहेत. नंदुरबार तालुक्यात गेल्यावर्षी दहा गट व 20 गण होते यंदा तेवढेच राहणार आहे तर नवापूर तालुक्यात गेल्यावर्षी नऊ गट व 18 गण होते यंदा 10 गट व 20 गण राहणार आहेत. प्रारूप अहवाल तयारजिल्हा परिषद आणि सहा पंचायत समितींच्या निवडणुकीची प्रक्रिया प्रशासकीय स्तरावर सुरू करण्यात आली आहे.  त्यानुसार 10 ऑगस्टर्पयत विभागीय आयुक्तांकडे प्रारूप गट-गण रचनेचा प्रस्ताव पाठविण्यात येणार होता. परंतु कर्मचा:यांचा संप,   मराठा आंदोलन आणि इतर कारणांमुळे प्रस्ताव 10 ऐवजी आता सोमवार, 13 ऑगस्ट रोजी  विभागीय आयुक्तांकडे पाठविला जाणार आहे. या प्रस्तावाला विभागीय आयुक्त 20 ऑगस्ट रोजी मान्यता देणार आहेत. त्यानंतर 27 ऑगस्ट रोजी गट, गणांची आरक्षण सोडत काढली जाणार आहे. 30 रोजी प्रभाग रचनेची अधिसुचना प्रसिद्ध केली जाणार  आहे.गट, गण रचनेसाठी गेल्या 15 दिवसांपासून संबधित कर्मचारी कामाला लागले होते. आता त्याला अंतिम स्वरूप दिले जात आहे. कुठला गट किंवा गण कसा राहील याकडे इच्छूक आणि राजकारणी मंडळींच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान, गट-गण रचनेचा मसुदा गोपनीय राहणार असून विभागीय आयुक्तांच्या मंजुरीनंतरच तो जाहीर केला जाणार आहे.