नंदुरबार : शहरातील बागवान गल्लीत किरकोळ वादातून हाणामारी करत सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या दोघांविरोधात पोलीसांनी कार्यवाही केली़ सोमवारी सायंकाळी हा प्रकार घडला़नासिर माजीद खान पठाण व महंमद समीर रऊफ खाटीक यांच्यात किरकोळ कारणावरुन वाद झाला होता़ या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले होते़ बागवान गल्लीतील पाण्याच्या टाकीजवळ हा प्रकार सुरु होता़ यावेळी घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते़ दोघे पोलीसांसमोरच हाणामारी करत असल्याचे दिसून आल्यानंतर दोघांविरोधात कारवाई करण्यात आली़याबाबत पोलीस नाईक कैलास सोनवणे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन नासीर खान पठाण व महंमद समीर खाटीक या दोघांविरोधात सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस नाईक साळूंखे करत आहेत़
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 12:10 IST