गप्पा मारण्याच्या वादातून हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 12:18 PM2020-05-27T12:18:39+5:302020-05-27T12:18:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विनाकारण गप्पा मारत असल्याच्या वादातून तालुक्यातील कोठली खुर्द येथे दोन गटात हाणामारी झाली़ रविवारी ...

Fighting over a chat argument | गप्पा मारण्याच्या वादातून हाणामारी

गप्पा मारण्याच्या वादातून हाणामारी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : विनाकारण गप्पा मारत असल्याच्या वादातून तालुक्यातील कोठली खुर्द येथे दोन गटात हाणामारी झाली़ रविवारी दुपारी घडलेल्या या घटनेनंतर दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला असून तीन जण जखमी झाले आहेत़
कोठली खुर्द येथील ईश्वर बलारसिंग नायक, गणेशा करणसिंग नाईक या दोघांसह १० ते १२ युवक सुपडू मानसिंग नायक यांच्या नवीन घराच्या बांधकामाच्या जागी बसून गप्पा मारत होते़ यावेळी युवकांना नायक कुटूंबियांनी हटकले होते़ याच राग येऊन रविवारी दुपारी रमेश सुपडू नायक यांच्या मालकीच्या किराणा दुकानात युवकांचा जमाव चालून जात प्रचंड तोडफोड करुन दगडफेक करण्यास सुरुवात केली होती़ तोडफोडीत सुमारे ३ हजार रुपयांचे नुकसान करण्यात आले़ यात रमेश नायक यांना मारहाण करण्यात आली तर दगडफेकीत गायत्री रमेश नायक, दिलीप सूपडू नायक, संगिता दिलीप नायक सर्व रा़ कोठली हे जखमी झाले़
दरम्यान दुकानाबाहेरील एमएच ३९ एच ४५४१ व एमएच ३९ एल ९९४१ या दोन दुचाकींची तोडफोड करुन नुकसान करण्यात आले़ याप्रकरणी रमेश नायक यांच्या फिर्यादीवरुन ईश्वर नायक, गणेश नाईक, विशाल भिमसिंग नायक, संतोष भाईदास नायक, योगेश धिरसिंग नायक, योगेश जारसिंग नाईक, मुकेश राजू नाईक, प्रल्हाद विरसिंग नाईक, श्रावण विरसिंग नायक, संजय उदेसिंग नाईक, सुभाष सजनसिंग नायक, गणेश भाईदास नाईक सर्व रा़ कोठली यांच्याविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरमयर सर्व १२ संशयितांना पोलीसांनी रविवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले होते़
दरम्यान १२ जणांना उपनगर पोलीसांनी रविवारी रात्री ताब्यात घेतले होते़ त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे़ परंतू कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी जामिनाची प्रक्रिया सुरु होती़

Web Title: Fighting over a chat argument

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.