शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी गावांवर अन्यायाची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 11:19 IST

सरसकट जाहीर केल्याने नाराजी : शहादा तालुका व नंदुरबारचा पुर्व भाग दुष्काळी

ठळक मुद्दे आणेवारीसाठी समितीचे गठण व्हावे.. पीक आणेवारी ठरविण्याबाबत महसूल व कृषी विभाग एकमेकांवर चालढकल करत असल्याचे प्रकार वारंवार निदर्शनास येतात. वास्तविक शासन निर्णयानुसार पैसेवारी ठरविण्याची आदर्श पद्धत आहे. त्यासाठी गाव स्तरावर एक समिती असते. समितीत तलाठी, ग

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नजर आणेवारी जिल्हाभरात सरसकट 50 पैशांपेक्षा अधीक लागू केल्याने नाराजी व्यक्त होत आहे. नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात तसेच संपुर्ण शहादा तालुक्यातील पीक परिस्थिती अतिशय खराब आहे. शहादा तालुक्यात तर सरासरीचा 30 टक्के पाऊस कमी आहे. असे सर्व असतांना केवळ अंदाजाने आणेवारी जाहीर करून शेतक:यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचा प्रकार केल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतक:यांमधून उमटत आहेत.   जिल्हा प्रशासनाने नुकतीच पीक नजर आणेवारी जाहीर केली आहे. जिल्ह्यातील सर्वच महसूल गावांमधील आणेवारी ही 50 पैशांपेक्षा अधीक असल्याचे जाहीर झाले आहे. त्यामुळे एकही गाव दुष्काळ किंवा अवर्षणग्रस्त राहणार नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. वास्तविक नंदुरबार तालुक्यातील पूर्व भाग आणि शहादा तालुक्यातील बहुतांश भागात पीक परिस्थिती अत्यंत खराब असतांना ही आणेवारी कुठल्या आधारावर तयार करण्यात आली असा प्रश्न निर्माण होत आहे.दुबार पेरणीशहादा तालुक्यातील अनेक भागात तसेच नंदुरबार व नवापूर तालुक्यातील ब:याच भागात पेरणीनंतर पावसाने ताण दिल्यावर दुबार पेरणी करण्याचे संकट शेतक:यांवर आले होते. त्या संकटातून शेतकरी थोडेफार सावरले होते. परंतु यंदा वरुणराजाने शहादा तालुक्यावर अवकृपा कायम ठेवल्याचे चित्र आहेच. त्यामुळे अनेक भागातील पीक परिस्थिती जेमतेम असतांना व यंदा उत्पादकता कमी येणार हे स्पष्ट असतांना कुठलाही सव्र्हे न करता सरसकट 50 पैशांपेक्षा अधीक आणेवारी जाहीर करून प्रशासनाने काय साध्य केले असा प्रश्न उपस्थित होत आहे. नंदुरबार तालुक्यातील पूर्व भाग तर नेहमीच अवर्षणप्रवण राहीला आहे. यंदा देखील या भागात कमी पजर्न्यवृष्टी झाली आहे. त्यामुळे पीक परिस्थिती फारशी समाधानकारक नसल्याचे चित्र आहे.शहादा : 30 टक्के तूटशहादा तालुक्यात पावसाची यंदा 30 टक्के तूट आहे. एकुण सरासरीचा केवळ 68 टक्के पाऊस या तालुक्यात झालेला आहे. आता पावसाळा संपण्यास केवळ 15 दिवस शिल्लक असल्यामुळे सरासरी भरून  काढण्याबाबत साशंकता असल्यामुळे गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही शहादा तालुक्यात पावसाची तूट राहणार आहे. शहादा तालुक्याचे एकुण सरासरी पजर्न्यमान 686.10 मिलीमिटर इतके आहे. आतार्पयत अर्थात पावसाळ्याच्या साडेतीन महिन्यात केवळ 466 मि.मी.पाऊस पडलेला आहे. गेल्यावर्षी याच तारखेर्पयत 522 मि.मी.पाऊस पडला होता.अंतिम आणेवारीत विचार व्हावाअंतिम पीक आणेवारी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवडय़ात जाहीर करण्यात येते. त्यावेळी तरी किमान शास्त्रीय आणि प्रचलित पद्धतीने आणेवारी काढून ती जाहीर करावी व शेतक:यांवरील अन्याय दूर करावा अशी मागणी होत आहे. याबाबत स्वत: जिल्हाधिका:यांनीच दखल घ्यावी अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे. गेल्यावर्षी 150 गावेगेल्यावर्षी देखील वरूणराजाने संपुर्ण शहादा तालुका आणि नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागावर अवकृपा केली होती. त्यामुळे शहादा तालुक्यातील 135 गावे आणि नंदुरबार तालुक्यातील 15 गावांमधील आणेवारी 50 पैशांच्या आत लागू झाली होती. परिणामी ही गावे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली होती. त्याचा लाभ शेतक:यांना मिळाला होता. यावर्षी देखील याच भागावर वरुणराजाने अवकृपा केलेली आहे. त्यामुळे गेल्यावर्षाप्रमाणे निर्णय घ्यावा अशी मागणी शेतक:यांमधून व्यक्त होत आहे.