लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील धानोरा येथे पोषण आहार वाटप करणा:या अंगणवाडी सेविकेला मारहाण करुन तिची ओढाताण करुन विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े शनिवारी सकाळी 9 वाजता ही घटना घडली़ धानोरा येथील अंगणवाडीत नियुक्त असलेली सेविका शनिवारी सकाळी नियमितपणे काम करत असताना राजू रामसिंग वसावे रा़ धानोरा हा आला़ त्याने सेविकेस मज्जाव करत घालवून देण्याचा प्रयत्न केला़ सेविकेने त्यास विरोध केला असता, त्याने तिला गालावर चपलेने मारहाण करुन ओढाताण केली़ यावेळी तिच्या बचावासाठी आलेल्या पतीसह बेदम मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली़ दरम्यान महिलेसोबत लज्जा येईल असे कृत्य करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली़ याबाबत पिडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित राजू वसावे याच्याविरोधात नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आह़े संशयिताची आई पूर्वी याठिकाणी अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होती़ त्याजागी सेविकेची नियुक्ती झाल्याचा राग मनात धरुन संशयित राजू याने सेविकेला मारहाण करुन विनयभंग केल्याची माहिती देण्यात आली आह़े
पोषण आहार वाटणा:या सेविकेचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 12:03 IST