शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील सूत्रधाराला अटक; ५ महिन्यांनंतर सुरक्षा दलांना मोठं यश, ऑपरेशन महादेव यशस्वी!
2
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
3
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
4
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
5
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
6
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका
7
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब आणि मुलावर गुन्हा दाखल; १५० हून अधिक लोकांना लाखोंचा फटका
8
Stock Market Today: सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात घसरण, निफ्टी ४० अंकांनी घसरला; Glenmark Pharma, Dixon Tech मध्ये तेजी
9
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
10
कुलदीप यादव सुसाट! जडेजा आणि मुरलीधरनचा रेकॉर्ड ब्रेक, मलिंगाचाही 'हा' विक्रम धोक्यात
11
पाकिस्तानची स्थिती बिकट होणार! भारतीय हवाई दलाला मिळणार ९७ तेजस विमाने
12
१ ऑक्टोबरपासून बदलणार ७ नियम, सामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम; ऑनलाइन गेमिंगपासून तिकिटापर्यंत आहे यादीत
13
Asia Cup 2025: हारिस रौफ आणि साहिबजादा फरहानवर बंदीची टांगती तलवार, मैदानातील गैरवर्तन महागात पडणार?
14
या संकटात बळीराजा तू एकटा नाहीस, अख्खा महाराष्ट्र सोबत आहे; हताश शेतकरी घेतायेत मृत्यूशी गळाभेट
15
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
16
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
18
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?
19
Swami Chaitanyananda Saraswati: वासनांध बाबा गरीब मुलींना हेरायचा, खोलीत बोलवून...; ५० मोबाईलचा तपास, ५ राज्यात धाडी  
20
लडाख हिंसाचारात चार जणांचा मृत्यू, ७० जण जखमी, कर्फ्यू लागू, इंटरनेटवर बंदी; भाजपचा काँग्रेसवर कट रचल्याचा आरोप

अतिदुर्गम भागात लसीकरणाची भीती कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:31 IST

ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांवर लसीकरण सुविधा उपलब्ध आहे. शहरात जशी लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे, तशी अनिवार्य ...

ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांवर लसीकरण सुविधा उपलब्ध आहे. शहरात जशी लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे, तशी अनिवार्य नसून, केवळ आधार कार्ड व इतर ओळखपत्रांच्या आधारावर लसीकरण करण्यात येत आहे. मात्र, तरीही दुर्गम भागातील अनेक नागरिक आजही लस घेण्याबाबत फारसे जागरूक नाहीत. त्यांच्यात लसींबाबत आजही अनेक गैरसमज आहेत. सातपुड्यात अनेक आदिवासी पाडे आहेत, अशा दुर्गम भागातील नागरिकांमध्ये लसींबाबत जनजागृती करण्यात सरकारी यंत्रणाही अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बहुसंख्य आदिवासी पाडे व दुर्गम भागातील आदिवासी बांधव लसीकरणापासून वंचित राहणार असल्याचे दिसून येत आहे. लसीकरणाबाबत दुर्गम भागातील नागरिकांना नेमके लसीकरण कुठे आणि कसे होणार, याचीही माहिती यंत्रणेकडून व्यवस्थित मिळत नसल्याने आम्ही लसीकरणासाठी कुठे जावे, याबाबतही दुर्गम भागातील नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. आमच्या गावापासून शहर दूर असल्याने लसीकरणासाठी वाहनाची व्यवस्थाही नाही, तर मग आम्ही लस घ्यायला लसीकरण केंद्रापर्यंत जाऊ तरी कसे, अशी प्रतिक्रिया सातपुड्यातील तोरणमाळ परिसरातील तरुणाने दिली आहे.

लसीपेक्षा वनौषधींवरच अधिक विश्वास

शहरी भागात कोरोना प्रतिबंधक लस मिळविण्यासाठी नागरिकांची वणवण होताना सध्या दिसत आहे. लसीकरण केव्हा होणार याची चिंता शहरवासीयांना लागलेली असताना, जिल्ह्यातील सातपुड्यातील आदिवासी समाज तर लसीकरणापासून कोसो दूर आहेत. हा समाज लस घेण्यासाठी पुढेच आलेला नाही. त्यामुळे समाजातील एक वर्ग लस मिळण्यासाठी धडपडत असून, दुसरा वर्ग असा आहे की, ज्याला लसीपेक्षा आयुर्वेदिक काढा आणि वनौषधींवरच अधिक विश्वास आहे. आम्हाला काहीही होत नाही निसर्ग आमचा मायबाप आहे. आम्ही सकाळी सूर्याच्या उन्हात असतो, अशी त्यांची भूमिका असून, ही लस घेतल्यानंतर माणूस जगत नाही, अशी त्यांना भीती वाटते. लसीमुळे ताप येतो, म्हणजे ती तापाची सुरुवात आहे, असाही त्यांचा गैरसमज आहे. आम्हाला कोरोना झालाच नाही, मग आम्ही लस का घ्यायची, अशीही त्यांची भूमिका आहे.

व्यापक जनजागृतीची गरज

कोरोनाबाधित रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून, त्यामुळे शहरी भागात लसीकरणासाठी रोज़च रांगा लागत आहेत. मात्र, दुसरीकडे जिल्ह्याच्या सातपुड्यातील दुर्गम भागातील आदिवासी समाज लसीकरणापासून कोसो दूर आहे. हा समाज अशिक्षित असल्याने त्यांच्यावर अंधश्रद्धेचा पगडा अद्याप कायम आहे. त्यामुळे या समाजाला लसीकरण केंद्रापर्यंत आणायचे झाल्यास, त्यांच्यातील अंधश्रद्धेला दूर करणे अत्यंत गरजेचे आहे. लसीकरणाच्या फायद्यांबाबत त्यांच्यात जनजागृती करणे अधिक महत्त्वाचे आहे. यासाठी काही ठिकाणी प्रयत्नही सुरू झाले आहेत. या अनुषंगाने जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील आदिवासी गावे, पाडे येथे लसीकरणाची नेमकी परिस्थिती काय आहे, याचा ‘लोकमत प्रतिनिधी’ने घेतलेला हा आढावा..

गैरसमज दूर करावे

जवळील लसीकरण केंद्रावर गेल्यानंतर १८ वर्षांवरील तरुणांना लस दिली जात नसल्याने, तरुणांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. ग्रामीण भागात सध्या रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनातील लसीबाबतचे गैरसमज दूर करून जास्तीतजास्त लसीकरण कसे होईल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

आम्ही सहसा डॉक्टरकडे जात नाही. झाडपाल्याचा उपयोग अधिक करतो. त्यामुळे कोरोना लसीकरणावर आमच्या लोकांचा विश्वास नाहीच. त्यामुळे लसीकरण करून घेत नाही.

- वनसिंग भिल, नंबरपाडा, रहिवासी