शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना व्हायरसबाबत गैरसमजाने भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 12:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : चीनमध्ये अक्षरश: धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे नागरिकांमध्येही प्रचंड दहशत पसरली आहे. शहरातील नागरिकांनी याबाबत ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : चीनमध्ये अक्षरश: धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे नागरिकांमध्येही प्रचंड दहशत पसरली आहे. शहरातील नागरिकांनी याबाबत सावधानता बाळगावी यासाठी तळोदा नगर पालिकेतर्फे शहरात ठिकठिकाणी पोस्टर्स, फलके लावून जनजागृती केली जात आहे. परंतु कोरोना व्हायरसबाबत दररोज मोठ्या प्रमाणात सोशल मिडियात वेगवेगळ्या पोस्ट व्हायरल होत असल्यामुळे नागरिकांची भिती कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे या प्रकरणी संबंधीत यंत्रणेने ठोस कार्यवाही करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.कोरोना या संसर्ग व जीवन घेण्या रोगाने शेजारच्या चीन देशात प्रचंड थैमान घातले आ हे. दिवसागणिक यात बळी पडलेल्यांची संख्याही वाढत आहे. आपल्या देशातदेखील एक-दोन ठिकाणी असे रूग्ण आढळून आल्याचे वृत्त आहे. त्यावर अजूनही ठोस असा औषधोपचार आढळून आलेला नाही. मात्र त्यावर प्रतिबंध घालणे एवढाच उपाय आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर तळोदा पालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाने जनजागृती मोहिम हाती घेतली आहे. यासाठी पालिकेमार्फत शहरातील सार्वजनिक चौका-चौकात पोस्टर्स व बॅनरर्स लावण्यात आली आहे. या बॅनर्सवर कोरोना व्हायरलची लक्षणे त्याबाबतच्या सावधानता अशा सूचना दिलेल्या आहेत. साहजिकच नागरिकही ते वाचत असल्यामुळे त्याच्यात प्रबोधन होण्यास मदत होत आहे.तळोदा पालिकेने जनजागृतीचा उपक्रम हाती घेतला असला तरी ग्रामीण खेड्यांमध्ये ग्रामीणांचा जनजागृतीबाबत ग्रामपंचायतींनी उदासिन भूमिका घेतल्याचा आरोप आहे. कारण कुठेच जनजागृती केली जात नसल्याचे सांगितले जाते. आधीच व्हॉटस् अ‍ॅप, इन्स्टाग्राम, फेसबुक अशा सोशल मिडियांकडून रोजच वेगवेगळ्या पोस्ट पद्धतशीरपणे पसविल्या जात आहेत. कुठे अमूक मुले तर कुठे तमूक मुले अशा वेगवेगळ्या अफवांचा नागरिकांमध्ये अक्षरश: बडीमार केला जात आहे. यामुळे नागरिकांची भिती कमी होण्याऐवजी त्यात भरच पडत आहे. तथापि यावर आवर घालणाºया संबंधीत यंत्रणांनी कार्यवाही करण्याऐवजी कानावर हात ठेवले असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आ हे. निदान वरिष्ठ प्रशासनाने तरी दखल घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.कोंबड्यांमुळेही कोरोनाचा संसर्ग पसरत असल्याची अफवादेखील पसरत असल्यामुळे त्याच्या भीती पोटी खवैय्यांनी मांस खाण्यावर आवर घातला असल्याचे म्हटले जात आहे. परिणामी चिकन व्यवसायावरही मोठ्या प्रमाणात मंदी असल्याचे काही व्यावसायिक सांगतात. विशेषत: ग्रामीण भागात अधिक फटकादेखील व्यावसायिकांना बसत असल्याचे सांगितले जात आहे. वास्तविक चिकन आणि कोरोना व्हायरस याचा काहीही एक संबंध येत नाही. याचा खुलासा पशुसंवर्धन विभागातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रसिद्धी माध्यमाद्वारे केला आहे, असे असतांना नागरिकांमध्ये नाहक भीती पसरवली जात आहे. यंत्रणांनीदेखील जनजागृतीबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी आहे. दरम्यान याबाबत येथील पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाकडे विचारणा केली असता कोरोना व्हायरस व चिकनमध्ये का ही एक लक्षणे आढळून आलेले नाहीत. तसे यंत्रणेतील वरील अधिकाºयांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान पशुसंवर्धन विभागाने दरवर्षाप्रमाणे यंदाही फेब्रुवारी, मार्च महिन्यात बर्ड फ्लूचा संभाव्य धोका लक्षात घेऊन येथील काही चिकन सेंटरर्सवर जावून खुराड्यातील कोंबड्यांची तपासणी करून तसे नमुने प्रयोग शाळेत पाठविण्याचे सूत्रांनी सांगितले.