शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

धरण फुटल्याच्या अफवेने नवापूरात भितीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 1:43 PM

नवापूरातील महाप्रलय : मदत व पुनर्वसनावर भर, पाचव्या मृतदेहाची ओळख पटेना

नवापूर : अतिवृष्टीच्या प्रलयानंतर आता मदतकार्य आणि पुनर्वसनावर प्रशासनातर्फे भर देण्यात येत आहे. पाणी ओसरल्याने आणि पावसानेही उसंत घेतल्याने नागरिकांना धिर आला आहे. रंगावली धरण फुटल्याची अफवा रात्रीपासून पसरली, परंतु अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन जिल्हाधिका:यांनी केले. बंधारे येथील बेवारसची ओळख पटलेली नाही.रंगावली व सिरपणी नदीच्या महापुरानंतर आता जनजिवन पुर्वपदावर येत आहे. प्रशासनाने नुकसानग्रस्तांना उभे करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांवर भर दिला आहे. जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकारी दिवसभर ठाण मांडून होते. मतदीचा ओघ सुरूरंगावली नदीच्या महापुरात नुकसान झालेल्या नागरिकांसाठी शहरातून व शहराबाहेरून मदतीचा ओघ सुरू आहे. पालिकेकडून सफाई अभियानाला वेग देण्यात आला. राजीवनगरातील आठ घरे व भगतवाडी पुलफळी येथील 68 घरे वाहून गेली. त्या 76 कुटूंबांसाठी हनुमानवाडीचे सभागृह व पालिकेचे बहुउद्देशीय भवनात राहण्याची व जेवनाची सोय करण्यात आली आहे. राजीवनगर, भगतवाडी व महादेवगल्ली येथे स्वयंपाकाची सोय सामाजिक कार्यकत्र्याकडून करण्यात आली. त्यासाठी शेकडो स्वयंसेवक महिला, पुरुष राबत आहेत.  सोमवारी आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे. हनुमानवाडीत त्यासाठी सोय करण्यात आली आहे. वाहतूक धिम्या गतीनेविसरवाडी ते दहिवेल दरम्यान रस्त्याचा खचलेल्या भरावाच्या ठिकाणी शनिवारी सायंकाळर्पयत काम सुरू होते. परिणामी जड वाहने आणि एस.टी.महामंडळाच्या लांब पल्ल्याच्या बसेस या नंदुरबार, निजामपूर, साक्रीमार्गे वळविण्यात आल्या होत्या.नवापूर : रंगावली धरणास जिल्हाधिका:यांनी शनिवारी सकाळी भेट देवून पहाणी केली. शिवाय पाणी पाझरत असलेल्या ठिकाणी तातडीने दुरूस्ती केली. दरम्यान, कुकराण येथील साठवण बंधा:याचा खचलेला भराव युद्धपातळीवर पूर्ववत करण्यात आला.रंगावली धरणाच्या मुख्य भिंतीला मोठे भगदाड पडले असून धरण फुटेल अशी अफवा शुक्रवारी रात्रीपासून पसरली होती. काहींनी नदीकिणारी वास्तव्यास असलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचाही सल्ला दिला होता. या अफवेची खातरजमा करण्यासाठी अनेकांनी धरणाच्या ठिकाणी धाव घेतली. जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी सकाळी तातडीने धरणस्थळी भेट दिली. सोबत जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी डॉ.अर्चना पठारे, तहसीलदार राजेंद्र नजन, पोलीस निरिक्षक विजयसिंह राजपूत यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. धरणाच्या मुख्य दरवाजापासून पाच मिटर अंतरावर एका ठिकाणी पाणी पाझरत असल्याचे अधिका:यांना दिसून आले. तेथे पहाणी केली असता पाझरणारे पाण्याचे प्रमाण अतिशय कमी असल्याचे स्पष्ट झाले. त्या ठिकाणी तातडीने दगड व मातीची पिचिंग करण्यात आली. हे काम होईर्पयत स्वत: जिल्हाधिकारी तेथे थांबून होते. धरणाला कुठलाही धोका नसल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. सद्य स्थितीत रंगावली धरण पुर्णपणे भरले असून सांडव्यातून पाण्याचा प्रवाह सुरू आहे. दरम्यान, कुकराण येथे जिल्हा परिषदेच्या साठवण बंधा:याची सांडव्याकडील मुख्य बाजुचा मातीचा भराव मोठय़ा प्रमाणात वाहून गेला होता. तहसीलदार राजेंद्र नजन यांनी प्रत्यक्ष भेट देवून पहाणी केली.  दुपारी भराव पूर्ववत करण्यात आला. सोनखडके व कोळदा येथील रहिवाशांनी यामुळे सुटकेचा नि:श्वास टाकला.अतिवृष्टी व पुरामुळे वाहून गेलेले पूल व रस्ते कामांचे आराखडा व अंदाजपत्रक तयार करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी दिल्या. दरम्यान, सोमवारपासून तीन ठिकाणी मदत केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.तहसील कार्यालयात जिल्हाधिका:यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. सर्वच विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी त्यांनी सांगितले, मेलेल्या जनावरांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावावी. तालुक्यात जनावारांना लसीकरणाच्या मोहिमेला वेग द्यावा. ज्या ठिकाणी विद्युत पोल, रोहित्र खराब झाले आहेत, तारा तुटल्या आहेत त्या ठिकाणी तातडीने दुरूस्तीच्या कामांना वेग देवून वीज पुरवठा सुरळीत करण्याचेही त्यांनी सांगितले. पिकांचे नुकसानीचे पंचनामे पुर्ण करावे. बोकळझर येथील वाहून गेलेल्या बंधा:याची पुनर्रबांधणी करण्यासाठी लवकरच कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. सोमवारपासू पालिका, तहसील व गटविकास अधिकारी कार्यालयात त्या त्या विभागांचे मदत केंद्र सुरू करण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला.