आॅनलाईन लोकमतशहादा, दि.२ : गावठाणच्या जागेचे मोजमाप करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच घेताना प्रकाशा (ता.शहादा) येथे शनिवारी दुपारी भूमापकास सुभाष धुडू साबळे व त्याचा मुलगा सुदर्शनसिंग साबळे यांना अटक करण्यात आली. सुभाष साबळे याला २०१५ मध्ये लाचप्रकरणी अटक झाल्याची माहिती समोर येत आहे.शहादा येथील उपअधीक्षक भूमीअभिलेख कार्यालयात परिरक्षण भूमापक सुभाष साबळे याच्याकडे आडगाव येथील गावठाण जागेचे मोजमाप करण्यासाठी तक्रारदाराने अर्ज केला होता़ यासाठी साबळे याने तक्रारदार आणि त्यांच्यासोबत असलेले १०० ग्रामस्थ यांच्या प्रत्येकाच्या घराचे मोजमाप करण्यासाठी प्रत्येकी ५०० रुपयांची मागणी केली होती़ तडजोडीनंतर ही रक्कम प्रत्येकीे ३०० रुपये एवढी ठरली. शनिवारी प्रकाशा येथे साबळे हा मुलगा सुदर्शनसिंग साबळे याच्यासह आला़ याठिकाणी त्यांनी तक्रारदाराकडून ३० हजार घेतले. यानंतर काही क्षणातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बाप-लेकांना अटक केली.याप्रकरणी साबळे बाप- लेकांविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही कामगिरी पोलीस उपआयुक्त डॉ़पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक एस़टी़ जाधव,पोलीस निरीक्षक करूणाशील तायडे, महिला पोलीस निरीक्षक संगीता पाटील, पोलीस कर्मचारी उत्तम महाजन, संजय गुमाने, दीपक चित्ते, जितेंद्र तांबोळी, मनोहर बोरसे यांच्या पथकाने केली़सुभाष साबळे याला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १२ फेब्रुवारी २०१५ रोजी लाच घेताना अटक केली होती. आडगाव येथे जमीन मोजणीसाठी पैसे घेणाºया साबळे याचा मुलगा सुदर्शनसिंग हा मध्यस्थ म्हणून काम करत असल्याची माहिती पुढे आली आहे़ तो अर्जदारांसोबत संपर्क करून परस्पर पैैसे उकळत असल्याची माहिती मिळाली.
प्रकाशा येथे ३० हजाराची लाच घेताना बाप-मुलाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 19:47 IST
आरोपीला २०१५ मध्ये झाली होती लाच प्रकरणात अटक
प्रकाशा येथे ३० हजाराची लाच घेताना बाप-मुलाला अटक
ठळक मुद्देआडगाव येथील गावठाण जागेचे मोजमाप करण्यासाठी घेतली लाचसाबळे याचा मुलगा सुदर्शनसिंग हा मध्यस्थ म्हणून करीत होता कामसाबळे याला २०१५ मध्ये लाच प्रकरणातच केली होती अटक