शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
3
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
4
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
5
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
6
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
7
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
8
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
9
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
10
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
11
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
12
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
13
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
14
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
15
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
16
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
17
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
18
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
19
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
20
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 

खतांच्या वाढीव भावाविरोधात शेतकऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:29 IST

देशातील रासायनिक खते तयार करणाऱ्या कंपन्यांनी रासायनिक खतांच्या किमतीत प्रचंड वाढ केली आहे. प्रत्येक खताच्या गोणीमागे २०० रुपयांपासून ते ...

देशातील रासायनिक खते तयार करणाऱ्या कंपन्यांनी रासायनिक खतांच्या किमतीत प्रचंड वाढ केली आहे. प्रत्येक खताच्या गोणीमागे २०० रुपयांपासून ते ४०० रुपयांपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या माथी मोठा आर्थिक बोजा लादला गेला आहे. एवढेच नव्हे तर डीएपी, मिश्रा खत, पोटॅश व सुफला अशा पिकास पोषक असणाऱ्या खतांच्या किमतीतदेखील मोठी वाढ केली आहे. संबंधित रासायनिक खतांच्या कंपन्यांच्या मनमानीमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात किमती वाढवूनदेखील केंद्र व राज्य सरकार त्यांना आवर घालायला तयार नाही. उलट त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी साफ दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. वास्तविक गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना सलग नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावे लागत असून, यामुळे उत्पादनात प्रचंड घट येऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. अगदी उत्पादनावर केलेला खर्चदेखील निघत नाही आहे. असे असताना कंपन्यांनी खतांच्या किमतीत भरघोस वाढ केली आहे. त्यामुळें शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे.

प्रत्यक्षात कृषी बाजार मंडईत समाधानकारक भाव मिळत नाही. व्यापारी शासनाचा हमी भावदेखील द्यायला तयार होत नाही. शेतकऱ्यांना कवडीमोल किमतीत माल विकावा लागत असतो. शिवाय शासन शासकीय धान्य खरेदी केंद्र सुरू करत नाही. दोन ते तीन महिन्यांपासून नोंद केलेल्या शेतकऱ्यांचा माल आजतागायत खरेदी झाला नाही, अशी शेतकऱ्यांची शोकांतिका असताना कंपन्यांनी खतांच्या किमती वाढवून शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे.

खतांच्या वाढत्या किमतीबाबत लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांनीदेखील मौन बाळगल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. रासायनिक खत कंपन्यांनी खतांची केलेली दरवाढ मागे घेण्यास केंद्र व राज्य सरकारने भाग पाडावे, अन्यथा जिल्ह्यातील सर्व शेतकरी ऐन लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन छेडतील, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

खतांच्या टंचाईबाबतही ठोस कार्यवाही व्हावी

गेल्या वर्षभरापासून सर्वच रासायनिक खतांची अधूनमधून टंचाई निर्माण केली जात आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड वैतागला आहे. ऐन पिकांच्या मोसमात रासायनिक खते मिळत नसल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. त्यातही विक्रेते ही संधी साधून मोठी आर्थिक लूट करीत असतात. वास्तविक शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा पुरेसा पुरवठा करणे स्थानिक प्रशासनाबरोबरच जिल्हा प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र या यंत्रणादेखील उपाययोजना करायला तयार नाही. त्यामुळे सर्वांचे फावते आहे. तथापि शेतकरी यात पुरता भरडला जात आहे. यंदाही शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी पूर्ण केली आहे. त्यामुळे आता तरी पुरेशा व मुबलक प्रमाणात रासायनिक खते, बी-बियाणांची तजवीज करून ठेवावी. शिवाय प्रचंड होणाऱ्या नफेखोरीवरसुद्धा लक्ष ठेवावे, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

लॉकडाऊनमुळे भावात घसरण

गेल्या वर्षापासून कोरोना महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी शासन लॉकडाऊन संपूर्ण राज्यात लागू करीत आहे. साहजिकच धान पिकाबरोबरच नगदी पिकांच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. लॉकडाऊनमुळे बाहेर बाजारपेठेत मालाला आवक नाही, अशी सबब पुढे करून व्यापारी याचाच फायदा घेत शेतकऱ्यांचा माल कवडीमोल किमतीत खरेदी करून अडवणुकीचे धोरण घेत आहे. इकडे शेतकरी सावकारी कर्जापायी नाइलाजाने कमी दरात शिवाय खराब होवू नये म्हणून शेतमाल देत आहे. त्यामुळेच हमीभावाबाबत केंद्राने कडक कायदा करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे प्रचंड फटका बसत आहे. उत्पादनावर केलेला खर्चदेखील निघाला नाही. त्यातच कंपन्यांनी रासायनिक खतांच्या प्रचंड किमती वाढविल्या आहेत. त्यामुळे खतांचे नियोजन करताना कसरत करावी लागणार आहे.

- वसंत सूर्यवंशी, शेतकरी, तळोदा

कंपन्यांनी यंदा सर्वच रासायनिक खतांच्या किमती भरमसाट वाढवल्या आहेत. त्यांच्या मनमानी कारभाराबाबत शासनाने कारवाई करण्याची गरज आहे. मात्र शासनानेच त्याबाबत उदासीन धोरण घेतले आहे.

- जितेंद्र पाटील, शेतकरी, बोरद