शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकी वसुलीसाठी तळोद्यातील शेतक:यांना वेठीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 13:02 IST

तळोदा तालुका : पाणीपुरवठा योजनांची 2 कोटींची थकबाकी

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 8 : तळोदा तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांची थकबाकी असलेल्या ग्रामपंचायतीकडून वसुली करण्यासाठी महाविरतणतर्फे कार्यवाही करण्यात येत आह़े संबंधित ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांची वीज खंडित करण्यात येणार असल्याने महावितरणकडून शेतक:यांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप करण्यात येत आह़ेतळोदा तालुक्यातील एकूण 94 गावे असून त्यापैकी 45 ठिकाणी पाणीपुरवठय़ांची वीज जोडणी करण्यात आली आह़े संबंधित  गावांकडे एकूण 2 कोटी 12 लाख रुपयांची थकबाकी आह़े तर महावितरणकडून अद्याप केवळ 11 लाख रुपयांचीच वसुली करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आह़े तालुक्यात एकूण 67 ग्रामपंचायती आहेत़ त्यांना जोडलेले पाडे मिळून एकूण 94 गावांची महसुली दप्तरी नोंद करण्यात आली आह़े तळोदा तालुक्याची वसुली सर्वाधिक कमी असल्याने याबाबत महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाकडून कार्यवाही करण्याचे पत्र प्राप्त झाले आह़े त्यानुसार थकबाकी न भरणा:या ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठय़ाची वीज खंडित करावी असे आदेश यात देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आह़ेशेतकरी धरले जाताय वेठीसदरम्यान, महावितरणकडून थकबाकी भरण्यासाठी ग्रामपंचायतींकडे तगादा लावला जात असल्याचे सांगण्यात येत आह़े त्यामुळे यातून साहजिकच शेतकरी वेठीस धरले जात असल्याच्या भावना त्यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहेत़ आधिच परिसरात पाण्याची पातळी खोल झाली आह़े त्यामुळे साहजिकच तालुक्यातील सपाटीवरील गावांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर रुप धारन करत असल्याचे दिसून येत आह़े अनेक ठिकाणी कमी दाबाचा पाणीपुरवठा होत आह़े त्यामुळे अशा परिस्थितीत पाणी पुरवठा खंडित झाल्यास पिकांना जगवावे कसे? असा प्रश्न शेतक:यांकडून विचारण्यात येत आह़े थकबाकीची वसुली करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींना वारंवार पत्र पाठविण्यात आले होत़े परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने मार्च महिन्यात जिल्ह्यातील 100 हुन अधिक गावांचा पाणीपुरवठा महावितरणकडून खंडित करण्यात आला होता़ त्यानंतर शेतक:यांचा यास विरोध झाल्यानंतर पुन्हा तीन दिवसात वीजपुरवठा सुरळीत करुन शेतक:यांना निदान थकीबाकीच्या 5 टक्के रक्कम त्वरीत भरण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले होत़े परंतु तालुक्यातून केवळ 11 लाख रुपये इतकीच वसुली झाली होती़ पुन्हा ग्रामपंचायतींकडून वीजपुरवठा खंडित करण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत़ त्यामुळे साहजिकच शेतकरी चिंतातूर झाले आह़े आधिच उन्हाळा असल्याने पाण्याची भिषण टंचाई निर्माण झाली आह़े त्यातच महावितरणकडून अजून पाणीपुरवठय़ाची वीज खंडित करण्यात येत असल्याने शेतक:यांसमोरील चिंता अधिक वाढणार असल्याचे सांगण्यात येत आह़े खरिपासाठी पाण्याची गरजदरम्यान, आता काहीच दिवसांवर खरिप हंगाम येऊन ठेपला आह़े यात, केळी, पपई आदी विविध पिकांची शेतक:यांकडून लागवड करण्यात येत आह़े त्यामुळे साहजिकच यासाठी पाण्याची आवश्यकता आह़े महावितरवणकडून पाणीपुरवठय़ाची वीज खंडित केल्यास शेतक:यांना खरिप हंगाम घेणे कठीण जाणार असल्याची चिंता शेतक:यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े