शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक खतांच्या टंचाईने शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 12:42 IST

युरियानंतर आता पोटॅश मिळेना : दुहेरी संकटामुळे शेतकरी हतबल

तळोदा : तालुक्यातील शेतक:यांना आसमानी संकटाबरोबरच सुलतानी संकटांचाही सामना करावा लागत असल्याने शेतकरी अक्षरश: हतबल झाला आहे. कारण त्यांना शासनाकडून पुरेशा प्रमाणात रासायनिक खते उपलब्ध होत नसल्याने शेतक:यांमध्ये मोठय़ा प्रमाणात असंतोष आहे. युरीयानंतर आता शेतक:यांपुढे पोटॅश खताची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी पिकांचे पोषणच खुंटले आहे. जिल्हा प्रशासनाने याप्रकरणी गंभीर दखल घेवून रासायनिक खते पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावे, अशी शेतक:यांची मागणी आहे.ऑगस्ट महिना अर्धा संपण्याच्या मार्गावर असतांना संपूर्ण तळोदा तालुक्यात अजून पावेतो नद्या-नाले दुथडी भरून आले नाही. शिवाय अद्यापर्पयत पावसाने सरासरीची निम्मेही गाठली नाही. साहजिकच शेतक:यांचे तोंडचे पाणी अक्षरश: पळाले आहे. शेतक:यांना आसमानी संकटांबरोबरच सुलतानी संकटांचाही सामना करावा लागत असल्याची त्यांची व्यथा आहे. कारण सद्या शेतक:यांना रासायनिक खतांच्या टंचाईस मोठय़ा प्रमाणात तोंड द्यावे लागत असल्याचे चित्र आहे. सुरूवातीस युरीयाची टंचाई निर्माण झाली होती. जेमतेम ते उपलब्ध झाल्यानंतर आता पोटॅश खतांचा प्रश्न उभा राहिला आहे. तुरळक पावसामुळे सर्वच पिकांची परिस्थिती उत्तम आहे. मात्र त्यात आता रासायनिक खतांनी खोडा घातला आहे. ऊस, केळी, पपई व कापूस या पिकांना मिश्र खतांबरोबरच पोटॅशची मात्रा देण्याची लगबग शेतक:यांनी सुरू केली आहे. परंतु नेमके पोटॅश खतच बाजारात मिळत नसल्याने मात्रा रखडली आहे. गेल्या दीड महिन्यापासून या खतांची टंचाई निर्माण झाली आहे. खताअभावी पिकांची मात्रा रखडल्यामुळे पिकांचे पोषणच थांबल्याचे शेतकरी सांगतात. गुजरातमधून नंदुरबार, शहादा येथेही पोटॅश उपलब्ध होत नसल्यामुळे शेतक:यांना नाईलाजाने गोणीमागे अतिरिक्त किंमत देवून आणावे लागत आहे. साहजिकच शेतक:यांचीही प्रचंड आर्थिक लुट होत आहे. वास्तविक खरीप हंगाम सुरू होण्याआधीच येथील कृषी विभागाने सुयोग्य नियोजन करून सर्वच प्रकारच्या रासायनिक खतांची मागणी करणे अपेक्षित होते. मात्र त्यांच्या उदासिन भुमिकेमुळे शेतक:यांना खतांच्या तीव्र टंचाईस सामोर जावे लागत असल्याचा शेतक:यांचा आरोप आहे. आता पिकांना खतांची मात्रा देता आली नाही तर त्यांच्या वाढीबरोबरच पोषण ही थांबले आहे. परिणामी उत्पादनातही मोठी घट होण्याची शक्यता शेतक:यांनी वर्तविली आहे. आधीच पजर्न्यमानाने संकटात सापडलेला शेतकरी अधिक कर्ज बाजारी होणार आहे. निदान जिल्हा प्रशासनाने तरी याप्रकरणी गंभीर दखल घेवून रासायनिक खतांच्या टंचाईचा प्रश्न मार्गी लावावा, अशी शेतक:यांची मागणी आहे.