शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांचा पारंपरिक पिकांना फाटा, ‘कुफरी ज्योती’ वाणाव्दारे बटाटा पिकाची लागवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2018 07:58 IST

धडगाव परिसरात बटाट्याची लागवड करण्यासाठी शेतकºयांचा कल वाढत आहे़ ‘कुफरी ज्योती’ या बटाट्याच्या वाणाच्या माध्यमातून येथील शेतकरी लाखोंची उलाढाल करीत आहेत़

- राजू पावरा/संतोष सूर्यवंशीनंदुरबार - धडगाव परिसरात बटाट्याची लागवड करण्यासाठी शेतकºयांचा कल वाढत आहे़ ‘कुफरी ज्योती’ या बटाट्याच्या वाणाच्या माध्यमातून येथील शेतकरी लाखोंची उलाढाल करीत आहेत.बटाट्यावर येणारा करपा तसेच साठवणुकीसाठी येथे वाव नसल्याने शेतकºयांकडून बटाटा लागवडीकडे दुर्लक्ष करण्यात येत होते़ परंतु आता पुन्हा शेतकरी पारंपारिक पिकांना फाटा देत बटाटा लागवडीकडे वळले असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे़ भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्लीअंतर्गत डॉ़ हेडगेवार सेवा समिती संचलित नंदुरबार कृषी विज्ञान केंद्रातर्फे धडगाव येथे ‘निक्रा’ हा प्रकल्प तालुक्यातील उमराणी येथे सुरु करण्यात आला आहे़हवामान बदलाचा कृषी क्षेत्रावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी हा प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. या प्रकल्पाअंतर्गत वेगवेगळे प्रयोग येथे होत असतात़ सातपुड्यातील धडगाव तालुक्यात इतर भागाच्या तुलनेत हवामान थंड आहे़ खरीप पिकानंतर अवघे १० गुंठे एवढेच क्षेत्र बागायती पिकासाठी ठेवण्याची क्षमता येथील शेतकºयांची असते़ हलक्या जमिनीत पाण्याची सोय असलेले शेतकरी बागायती पिके घेत असतात. बटाटा हे पिक कमी कालावधीचे थंड हवामानात तसेच मध्यम ते हलक्या जमिनीत घेता येते़ ‘निक्रा’ या प्रकल्पाअंतर्गत बटाटा या पिकाचा चाचण्या भुजगाव, उमराणी, सूर्यपूर, या परिसरात घेण्यात येत आहे़ सद्यस्थितीत पिक हे ५५ ते ६० दिवसांचे असून बटाट्याच्या पोषणाची अवस्था सुरु आहे़ ‘कुफरी ज्योती’ हा बटाटा वाण येथे अनेक शेतकºयांनी लावला आहे. याचा कालावधी ९० दिवसांचा असतो, तसेच ह्या वाणाची टिकवणक्षमता ही चांगली आहे़ म्हणून हा वाण लागवडीसाठी वापरला जातो. पाण्याची स्थिती पाहता गव्हापेक्षा आर्थिकदृष्ट्या हा वाण फायदेशीर ठरतो़ धडगाव परिसरातील धनाजे, सूर्यफुल, उमराणी, भुजगाव, शिवनीपाडा येथील शेतकºयांच्या शेतात सद्यस्थितीत यांचे प्रात्याक्षिक सुरु आहे़ नाना पावरा, धाकलसिंग पावरा, सुभाष पावरा, मोचडा पावरा यासह अनेक शेतकºयांनी या वाणाची यशस्वीरित्या लागवड केली आहे़ कोंब आलेल्या बटाट्यांचा बेणे म्हणून वापरकुफरी ज्योती याचा वाणाचा वापर करुन शेतकºयांकडून बटाटा पिकाची लागवड करण्यात येत आहे़ शिवाय कोंब आलेल्या बटाट्यांचा बेणे म्हणूनदेखील वापर करण्यात येत आहे़ पारंपारिक गहु पिकापेक्षाही बटाटा पिकाची लागवड व काढणी सोपी असल्याचे म्हटले आहे़ दरम्यान, बटाटा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने त्यावरही हे वाण रामबाण उपाय म्हणून समोर आले आहे़ब-याच वर्षांनंतर धडगाव तालुक्यातील शेतकरी आता बटाटा लागवडीकडे वळलेला दिसून येत आहे़ गहुच्या तुलनेत बटाट्याची लागवड व काढणीदेखील सोपी आहे़-रवींद्र पाटील,विषय विशेषज्ञ कृषीविज्ञान केंद्र, नंदुरबार

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र