शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

शेतकऱ्यांनी जल पुनर्भरण करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 12:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : शेतातील पावसाचे वाया जाणारे पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून बोअरवेलमध्ये जलपुर्नभरण करून भूजल पातळी ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : शेतातील पावसाचे वाया जाणारे पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून बोअरवेलमध्ये जलपुर्नभरण करून भूजल पातळी वाढविण्याचा उपक्रम शहरातील डॉ.सूर्यकांत पंजराळे करीत आहेत. त्यांच्या या प्रयत्नाला यश येत असल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्यातील शेतकऱ्यांनीदेखील असा उपक्रम राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.एकेकाळी तळोदा तालुका हा मुबलक पाण्यामुळे सुजलाम सुफलाम असा होता. कारण भूगर्भातील पाण्याची पातळी अतिशय उंचावर होती. अगदी १५ ते २० फुटावर पाणी होते. परंतु गेल्या १० ते १५ वर्षांपासून वार्षिक पर्जन्यमान घटत असल्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळीतही कमालीची घट झाली आहे. सद्या ती १५० ते २०० फुटावर गेली आहे. त्यामुळे शेतकºयांचे बोअरवेल निकामी होण्याचे प्रमाणदेखील अलिकडे मोठ्या प्रमाणावर वाढले होते. त्याचबरोबर बागायतीचे प्रमाण सुद्धा कमी झाले होते. साहजिकच जलपुर्नभरण करणे ही काळाची गरज बनली आहे. म्हणून तळोदा शहरातील शेतकºयांनी गेया वर्षी नदी खोलीकरण, नांगरटी असे उपक्रम राबविले होते.तालुक्यातही काही गावांमधील युवक शेतकºयांनी पाणी अडवा, पाणी जिरवा उपक्रम राबविला होता. त्याचा परिणाम म्हणून नदी-नाल्यानचे पाणी तेथेच झिरले. परिणामी भूगर्भातील पाण्याची पातळीदेखील प्रचंड उंचावर आली. त्यामुये यंदाच्या उन्हाळ्यात बोअरवेलचे पाणीही टिकून राहिले. असाच जलपुर्नभरणाचा उपक्रम तळोद्यातील डॉ.सूर्यकांत पंजराळे हे वैद्यकीय व्यवसाय असलेले डॉक्टर शेतकरी आपल्या खाजगी शेतात राबवित आहेत. त्यामुळे ऐन दुष्काळी परिस्थितीतही त्यांचा कृषीपंप पूर्ण क्षमतेनुसार चालत होता. वास्तविक या परिसरात अनेक बोअर निकामी ठरले होते. परंतु त्यांचा बोअरवेलवर काहीच फरक पडला नसल्याचे ते म्हणतात.आपल्या हातोडा रस्त्यावरील शेतात बोअरवेल जवळ चार ते सहा फुट आकाराचा खड्डा करून तेथील गेसिंग पाईपला चिºया पाडल्या आहेत. त्यानंतर गेसींग पाईपच्या अवती भोवती मोठी जाळी बसवली जेणे करून स्वच्छ पाणीच आत येईल. त्याचबरोबर खोदलेल्या खड्ड्यात म्हणजे वरच्या भागात लहान दगड, गोटे, खडी, वाळू, कोळसा याचा थर देवून खड्डा करावा. अशा रेन हार्वेस्टिंगच्या माध्यमातून शेतात पडणारे पावसाचे पाणी इतरत्र वाहून न जाता बोअरवेल जवळच जिरत असते. साहजिकच बोअरची पाण्याची पातळीदेखील प्रचंड वाढली आहे. या उपक्रमासाठी अत्यंत कमी खर्च येतो. कमी खर्चिक आणि सहज करता येत असल्यामुळे सर्वच शेतकºयांनी आपल्या शेतातील वाया जाणारे पाणी अडवून अशा प्रकारे जमिनीत जिरवले तर तळोदा तालुक्याला निश्चितच गतवैभव मिळवता येईल. तथापि याबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याची अपेक्षा आहे. दरम्यान गेल्या वर्षी भूगर्भातील जलपातळी वाढविण्यासाठी शहरातील तरूणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. त्यामुळे नद्या-नाल्यांचेही रूंदीकरणाबरोबर खोलीकरण झाले होते. जणू एक प्रकारे शेतकºयांनी पाणी चळवळच उभी केली होती. मात्र यंदा त्याकडे कोरोनाच्या महामारीमुळे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.