शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
2
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
3
छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...
4
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
5
'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले
6
MI vs DC : अक्षर पटेल का नाही?; फाफ म्हणाला. मागच्या दोन दिवसांपासून तो....
7
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
8
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
9
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
10
मुंबईतील कामचुकार कंत्राटदारांना बसणार मोठ्ठा दणका! पालकमंत्री शेलारांनी दिले महत्त्वाचे आदेश
11
Video: जुळ्या बहिणींचे जुळ्या भावांसोबत लग्न; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल...
12
ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्याचे अभिनंदन, पण 'त्या' प्रश्नांच्या उत्तरांचं काय?- काँग्रेस
13
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू
14
जपानमध्ये तांदळावर कृषीमंत्र्यांनी असं काय म्हटलं?; ज्याने द्यावा लागला मंत्रिपदाचा राजीनामा
15
नव्या गर्लफ्रेंडची साथ मिळताच शिखर धवनने घेतला आलिशान बंगला; किंमत ऐकून बसेल धक्का
16
गुरुवारी गजकेसरी योग: ८ राशींवर लक्ष्मी कृपा, अपार गुरुबळ; बक्कळ लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
17
कोण म्हणतं वय झालं? ८६ आणि ८४ वर्षांच्या दोन बहिणींनी ठरवलं जग पहायचं, आणि निघाल्या..
18
सैफुल्लाहच्या शोकसभेत भारताविरोधात ओकली गरळ; पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा उघड
19
Coronavirus: धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
20
"अजितदादा, तुम्ही पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार?", सुषमा अंधारे संतापल्या

रणरणत्या उन्हात शेतक:यांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 11:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  तापी नदीवरील 22 उपसा सिंचन योजनेसाठी आता आर या पार लढाईचा नारा देत आश्वासने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  तापी नदीवरील 22 उपसा सिंचन योजनेसाठी आता आर या पार लढाईचा नारा देत आश्वासने नकोत तर थेट योजना दुरुस्तीच्या कामांना तातडीने सुरुवात करावी या मागणीसाठी लाभधारक शेतक:यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.जिल्ह्यातील बहुतांश गावातील शेतक:यांनी तापीनदी काठावरील 22  उपसा सिंचन योजना दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवार, दि. 27 मे पासून उपोषणाला सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील विविध भागातील शेतक:यांनी सकाळी नऊ वाजेपासून आंदोलन स्थळी एकत्र यायला सुरुवात केली. त्यानंतर 11 वाजता विविध गावातुन आलेले शेतकरी एकत्र आल्यानंतर त्यांनी उपोषणस्थळी जोरदार घोषणाबाजी केली.  शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिका:यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील 22 उपसा सिंचन योजनांचे दुरुस्तीचे काम अपूर्ण अवस्थेत असून अत्यंत मंदगतीने योजनांच्या विद्युत, यांत्रिकी व स्थापत्य विभागातील कामे सुरू आहेत. यामुळे योजनांचा लाभ संबंधित शेतक:यांना कधी मिळेल हे सांगता येणे कठीण आहे. 21 मे रोजी जलविद्युत प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता व उपसा सिंचन योजना क्र.2 धुळे येथील कार्यालयात विद्युत कामाविषयी चर्चा केली. 21 मे रोजी पाटबंधारे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता, मध्यम प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता, यांत्रिकी विभाग जळगाव चे कार्यकारी अभियंता, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांच्या उपस्थितीत योजनांच्या लाभधारकांची बैठक बोलावून कामकाजाविषयी चर्चा करण्यात आली होती.बैठकीत अधिका:यांकडून कोणत्याही प्रकारची निर्णयाप्रत उत्तरे मिळालेली नाहीत. त्यामुळे योजनांचे लाभधारक शेतकरी हे हवालदिल झाले. बैठकीत अधिका:यांमार्फत शेतक:यांना कुठल्याही प्रकारचे आश्वासन देण्यात आले नाही असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.निवेदनावर मुकेश पाटील, उद्धव पाटील, भगवान पाटील, यशवंत पाटील, रतिलाल पाटील, गोपाळ पाटील, रितेश बोरसे, कांतीलाल पाटील, रोहिदास पाटील, वसंत पाटील, अशोक पाटील, संजय पाटील, जिजाबराव पाटील, निळकंठ पाटील, विकास पटेल, अमोल पटेल, पुरुषोत्तम पाटील, बिपीन पाटील, रवींद्र पाटील, ईश्वर पाटील, गौरव पाटील, तुषार पाटील, एकनाथ पाटील, राजाराम पाटील, विनोद पाटील, किशोर पाटील, डॉ. राजेंद्र पाटील, डॉ.किशोर पाटील, रवींद्र पाटील, साहेबराव गायकवाड, सोमा कोळी, योगेश बोरसे, युवराज शिरसाठ, देविदास कोळी, काळू पिंजारी, युवराज बोरसे, संभाजी  बोरसे, शेनपडू बागूल, संभाजी     बोरसे,  युवराज शिरसाठ, पुंडलिक देवरे, नितीन बोरसे, राजाराम      पाटील, गोविंद पाटील आदि लाभधारक शेतक:यांच्या सह्या  आहेत.

42 अंश तापमानात शेतक:यांचे उपोषण..

सोमवारचे तापमान 42 अंश सेल्सिअस होते. उन्हाच्या झळा वाहत असतानाही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेल्या शेकडो शेतक:यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. मोठ्या संख्येने शेतकरी उपोषणाला बसणार असल्याची कल्पना प्रशासनाला असून सुद्धा पिण्याच्या पाण्याची कुठलीही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली नव्हती. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात आली. उपोषण स्थळी अनेक शेतक:यांनी घरूनच पाणी पिण्यासाठी आणले होते. आधीच दुष्काळाने होरपळणा:या उपोषणकत्र्या शेतक:यांना जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पिण्यासाठी पाण्याकरीता देखील वणवण करावी लागली. यामुळे अनेक वृद्ध शेतक:यांचे हाल झाले.