शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कांदा दर वाढूनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 12:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये गेल्या १५ दिवसात कांद्याचे दर प्रतिक्विंटल साडेसहा हजारापर्यंत पोहोचले होते़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये गेल्या १५ दिवसात कांद्याचे दर प्रतिक्विंटल साडेसहा हजारापर्यंत पोहोचले होते़ यातून बाजारात कांदा तेजीत येऊन शेतकऱ्यांमध्ये आनंद असल्याचे चित्र निर्माण झाले होते़ परंतू प्रत्यक्षात एकदोन शेतकºयांना कांद्याचे चांगले दर देऊन उर्वरित चांगला कांदाही खराब असल्याचे कारण देत तो कमी दराने खरेदी करण्याचे प्रकार झाले आहेत़यातून खराब असल्याच्या नावाने खरेदी केलेल्या कांद्याची किरकोळ बाजारात तेजीत विक्री करुन व्यापारी नफा कमावत असल्याचे चित्र सध्या येथे आहे़ याप्रकारामुळे शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली असून मालाला लिलाल पद्धतीने समान दर देण्याची मागणी केली आहे़नंदुरबार बाजार समितीत सोमवारी बाजार सुरु झाल्यानंतर तब्बल साडेसहाशे कट्टे कांदा आवक झाली होती़ या कांद्याला १२ ते ५५ रुपये प्रतिकिलो दर देण्यात आले होते़ यात काही माल कोरडा असल्याने त्याला ५ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दर दिले गेले परंतू आकाराने लहान परंतू कोरडा आणि काहीशी काजळी असलेल्या मालाला थेट प्रतिकिलो १२ रुपयांपर्यंत दर देण्यात आला़ यातून शेतकºयांनी नाराजी व्यक्त करत योग्य त्या पद्धतीने पडताळणी करुन दर देण्याची मागणी केली आहे़नंदुरबार बाजारात लिलाव पद्धतीने मालाची प्रतवारी तपासून खरेदी करणे रास्त असताना बाजार समितीचे व्यापारी कांद्याचा आकार आणि ओलाव्यानुसार दर ठरवून खरेदी व विक्रीचे व्यवहार करत आहेत़ यातून शेतकºयांचे नुकसान होत असून कांदा तेजीत असतानाही हाती अपेक्षित रक्कमच येत नसल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात येत आहे़नंदुरबारच्या किरकोळ बाजारात कांदा १०० रुपये प्रतिकिलो दरांपर्यंत पोहोचला आहे़ यात सडका कांदाही ५० रुपयांच्या दरात मिळतो़ परंतू शेतकºयांकडून हाच कांदा १२ ते ३५ रुपये प्रतिकिलो दराने व्यापारी खरेदी करुन त्यात सुधारणा करुन दुप्पट दराने किरकोळ विक्रेत्यांना देतात़ आधीच वाढीव दराने खरेदी केलेला कांदा वाढीव दरात विक्री करण्याची स्पर्धाच किरकोळ विक्रेत्यांमध्ये सुरु होते़ याप्रकारांकडे बाजार समिती प्रशासनाने लक्ष घालण्याची शेतकºयांची अपेक्षा आहे़