शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे फसवणुकीतील शेतकरी वा-यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 13:03 IST

कृषी विभागाची बेपर्वाई : जिल्हाधिका-यांच्या सूचनांकडे जिल्हा परिषद कृषी विभागाचे दुर्लक्ष

रमाकांत पाटील । ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 5 : बोगस बियाणे विक्रीवर प्रतिबंध घालण्यासाठी कृषी विभाग व जिल्हा परिषद प्रशासनाने कितीही आव आणला असला तरी प्रत्यक्षात मात्र बोगस बियाणे विक्री करणा:यांवर कुठलीही कारवाई करण्यास जि़प़चा कृषी विभाग असमर्थ ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी तब्बल 800 शेतक:यांची फसवणूक झाल्याची तक्रार असून, त्याबाबत पंचनामे करण्यात आले. मात्र नवीन वर्ष सुरू झाले तरी अद्याप त्यावर कारवाई न झाल्याने शेतक:यांमध्ये संतप्त भावना व्यक्त होत आहेत. यावर्षीही त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता असून, कृषी विभागाचे बोगस बियाणे विक्रेत्यांना समर्थन तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.जिल्ह्यात गेल्यावर्षी 37 हजार 774 हेक्टर क्षेत्रात ज्वारीचा पेरा झाला होता. त्यापैकी जवळपास चार हजार हेक्टर क्षेत्रातील ज्वारीच्या पिकाला कणसेच आले नव्हते. ज्या शेतक:यांनी विविध चार कंपन्यांचे नऊ नंबरचे वाण लावले होते, त्यांच्या शेतातील हे चित्र होते. कडब्याला कणीस न आल्याने अथवा त्यात दाणाच न भरल्याने संबंधित शेतक:यांनी तक्रारी केल्या. सुरुवातीला त्याबाबत शेतक:यांची फारशी दखल घेतली गेली नाही. मात्र तक्रारी वाढल्यानंतर जिल्हाधिका:यांनी दखल घेऊन पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कृषी विभागाने पंचनामे केले. जवळपास 800 शेतक:यांच्या शेतात अशी स्थिती असल्याचे त्यातून स्पष्ट झाले. त्यानंतर या शेतक:यांना नुकसान भरपाई देण्याबाबत चर्चा झाली. मात्र संबंधित विक्रेत्यांनी व कंपन्यांनी वेळ काढू भूमिका घेतली. पुन्हा शेतक:यांचा तगादा वाढल्याने या संदर्भात जिल्हाधिका:यांनी कृषी विभागाला याप्रकरणी सामूहिकपणे ग्राहक मंचात संबंधित कंपन्यांविरुद्ध दावा दाखल करण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु प्रत्यक्षात त्याची अद्यापही दखल घेतली गेली नसल्याने बियाणे फसवणुकीतील शेतकरी वा:यावरच आहे.दरम्यान, खरीप हंगामाची सध्या तयारी सुरू असल्याने प्रशासन बैठका घेऊन बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई करण्याची वल्गना सातत्याने करीत आहे. परंतू बोगस बियाण्याच्या माध्यमातून गेल्यावर्षी शेतक:यांची फसवणूक करणा:या बियाणे विक्रेत्या कंपन्यांवर तसेच किरकोळ  विक्रेत्यांवर कुठलीही कारवाई करीत नसल्याने बोगस ज्वारी बियाण्यामुळे नुकसान झालेल्या शेतक:यांमध्ये प्रशासन व कृषी विभागाविरुद्ध संतापाचे वातावरण आहे. ज्या विक्रेत्यांनी शेतक:यांना बोगस बियाणे विक्री केले ते विक्रेते यंदाही राजरोसपणे तेच  बियाणे विक्री करीत असून, गेल्या वर्षाप्रमाणेच यंदाही ते शेतक:यांची फसवणूक करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र कृषी विभाग आणि विक्रेत्यांचे व कंपन्यांचे साठे लोटे असल्याने कुणीही कारवाई करण्यास धजावत नसल्याचा आरोप शेतक:यांकडून करण्यात आला आहे. वास्तविक जे बियाणे गेल्यावर्षी विक्री झाले ते ज्वारीचे वाण विक्रीवर दोन वर्षापूर्वीच बंदी असल्याचे बोलले जात आहे. असे असतानाही ते गेल्यावर्षी विक्री कसे झाले, असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे.नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असून, या जिल्ह्यात सातत्याने विविध घटनांमध्ये आदिवासींचीच मोठय़ा प्रमाणावर फसवणूक होत असल्याचे चित्र आहे. या पूर्वी आदिवासी शेतक:यांच्या शेतातील पूर्ण विहिरीच गायब करून प्रशासनाने फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते.आता या प्रकरणातदेखील सर्वाधिक शेतकरी आदिवासी आहेत. जवळपास निम्मे शेतकरी धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील आहे. हे शेतकरी दिवाळीनंतर उदरनिर्वाहासाठी स्थलांतर करतात. त्यानंतर फक्त खरिपाचे पीक घेण्यासाठी गावी येतात.त्यांचे अर्थकारण या एका पिकावर अवलंबून असते. असेच हे शेतकरी असून, त्यांचे गेल्या वर्षाचे ज्वारीचे पूर्ण पीक वाया गेल्याने या शेतक:यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. पीक घेण्यासाठी केलेला खर्च तर वाया गेलाच पण एक रुपयाही उत्पन्न न आल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे.