शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

शेतकरी कर्जमुक्तीला गोंधळाची युक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 11:59 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषद निवडणूक कामकाजामुळे मागे पडलेल्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत ९ जानेवारी रोजी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषद निवडणूक कामकाजामुळे मागे पडलेल्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत ९ जानेवारी रोजी शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित झाल्या आहेत़ परंतू या याद्या फक्त जिल्हा बँक लाभार्थींच्या असून राष्ट्रीयकृत बँकांनी साडेचार हजार आधार लिंक नसलेले शेतकरी पुढे करुन वेळ मारुन नेली आहे़ बँकांच्या या युक्तीमुळे गोंधळात भर पडला असून कर्जमुक्तीबाबत संभ्रम अधिक वाढला आहे़२०१५ पासून थकीत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेत शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना पुढे आणली आहे़ योजनेचा अध्यादेश काढल्यानंतर बँकांनी सात जानेवारीपर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या ्रप्रकाशित करण्याची मुदत होती़ यात आधार लिंक नसलेल्या शेतकºयांना माहिती देऊन ते लिंक करुन घेण्याचे ठरले होते़ जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणूकीमुळे हे कामकाज लांबून प्रत्यक्षात ९ जानेवारी रोजी याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत़ यांतर्गत जिल्हा बँकेचे १७ हजार सभासद पात्र असताना साधारण १४ हजार शेतकरी लाभार्थींच्या याद्या प्रकाशित झाल्या आहेत़ या याद्या त्या-त्या ग्रामपंचायत, बँक शाखा आणि गावात दवंडी देऊन प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती प्रशासन देत आहे़ दुसरीकडे राष्ट्रीयकृत बँकांनी याद्या प्रसिद्ध करण्याची वेळ आल्यानंतर आधार लिंक नसलेल्या शेतकºयांच्या याद्या त्याच्यांकडून दिल्या गेल्या आहेत़ परंतू आधार लिंक पूर्ण असलेल्या शेतकºयांचे काय, याबाबत उत्तर देताना मात्र बँकांचा गोंधळ स्पष्टपणे समोर येत आहे़ या प्रकारामुळे नंदुरबार जिल्ह्यात पात्र लाभार्थींची संख्या किती हे अद्याप समोर आलेले नाही़राष्ट्रीयकृत बँकांकडून पात्र लाभार्थींच्या याद्या देण्याबाबतची कारवाई कधी होणार याचेही उत्तर नसल्याने जिल्ह्यातील पात्र शेतकरी पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे़ प्रशासनाने राष्ट्रीयकृत बॅकांच्या कामकाजाकडे गांभिर्याने पाहून कारवाई करण्याची अपेक्षा शेतकºयांकडून करण्यात येत आहे़१ एप्रिल २०१५ ते ३० सप्टेंबर २०१९ या काळात जिल्हा बँकेच्या माध्यमातून कर्जवाटप करणाºया ३०७ विविध कार्यकारी संस्थांचा अहवाल जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे देण्यात आला आहे़ जिल्हा बँकेकडून कर्ज घेत एकूण ३०७ संस्थांनी १४ हजार ५७८ शेतकºयांना कर्जवाटप केले होते़ व्याजासह या कर्जाची रक्कम ही १०१ कोटी ९८ लाख ९५ एवढी आहे़ १४ हजार शेतकºयांच्या नावांच्या ३०७ याद्यांची तपासणी लेखापरीक्षक यांनी करुन दिल्यानंतर १३ हजार ९१६ शेतकºयांना पात्र ठरवण्यात आले आहे़ या शेतकºयांचे ८५ हजार १५ लाख ६६ हजार रुपयांचे कर्ज माफ करण्याची प्रक्रिया सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले आहे़ यातील किती शेतकरी आधार लिंक केलेले आहेत़ याची माहिती मात्र देण्यात आलेली नाही़ विशेष बाब ८५ कोटीपैकी २१ कोटी २५ लाख रुपये केवळ व्याजाची रक्कम मूळ कर्ज रक्कम ६३ कोटी एवढी आहे़जिल्हा बँकेच्या अहवालानुसार नंदुरबार तालुक्यातील ५ हजार ८९३, शहादा ४ हजार २८९, तळोदा ९६९, नवापुर १ हजार ६०३, अक्कलकुवा ४८९ तर धडगाव तालुक्यातील ७२३ शेतकरी कर्जमुक्तीला पात्र ठरणार आहेत़दुसरीकडे राष्ट्रीयकृत बँकांनी साडेचार हजार शेतकºयांची नावे असलेल्या याद्या प्रकाशित केल्या आहेत़ या याद्यांनुसार ज्यांचे आधार लिंकिंग नाहीत, त्यांनी लिंक करावयाचे आहे़ यानंतर त्यांना कर्जमाफी मिळणार आहे़ परंतू ज्यांचे आधीपासूनच आधार लिंक आहेत त्या शेतकºयांच्या याद्यांचे काय, याबाबत माहिती मात्र देण्यात आलेली नाही़ जिल्ह्यात एकूण ११ राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांमध्ये कामकाज सुरु असल्याची माहिती आहे़शासनाने जाहिर केलेल्या कर्जमुक्ती योजनेच्या अध्यादेशात आधार लिंक नसलेल्या शेतकºयांच्या याद्या आधी प्रकाशित करण्याचा कोणताही उल्लेख नसताना बँकांनी केलेल्या कामकाजामुळे गोंधळ निर्माण होत आहे़प्रशासनाकडून ग्रामस्तरावर कामकाज करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे़ परंतू अद्याप कोणत्याही गावात दवंडी देणे किंवा कर्जमुक्तीबद्दल माहिती देण्यात आले नसल्याचे समोर आले आहे़ विशेष म्हणजे ग्रामीण भागातील बँकांबाहेरही याद्या दिसलेल्या नाहीत़