लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : शेतक:यांना शेतीसोबतच इतरही शेतीपूरक उद्योगातून लाभ मिळावा यासाठी वनविभाग पुढे सरसावला असून जिल्ह्यातील सुमारे 3 लाख हेक्टर पेरणी योग्य क्षेत्रासाठी बांबू रोपे उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला आह़े यासाठी मेवासी आणि नंदुरबार वनक्षेत्रांतर्गत कारवाई सुरु करण्यात आली आह़े वनविभागाच्या अटल बांबू समृद्धी योजनेंतर्गत हा उपक्रम राबवला जाणार असून शेतक:यांना लाभदायी ठरले अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े या योजनेंतर्गत शेतजमिन आणि शेतबांधावर ही रोपे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत़ यासाठी जिल्ह्यातील वनविभागाच्या 36 रोपवाटिकांमध्ये बांबू लागवडीचे प्रयोग सुरु असल्याची माहिती देण्यात आली आह़े येत्या काही दिवसात या योजनेत सहभाग नोंदवणा:या शेतक:यांच्या शेतात बांबू रोपे मागणीनुसार पोहोचवली जाणार आहेत़ बांबू हे एक बहुपयोगी वनउपज असून आर्थिकदृष्टय़ा अत्यंत महत्त्वाचे असल्याने त्यास हिरवे सोने असेही संबोधले जात़े लाकूड विषयक गरजा पूर्ण करण्याकरिता सहज उपलब्ध ठरणारा व परवडणारा असल्याने त्याच्या खरेदी विक्रीचा मोठा उद्योग आह़े हा उद्योग जिल्ह्यातील शेतक:यांना माहिती पडावा यासाठी वनविभागाने हा उपक्रम हाती घेतला आह़े याअंतर्गत योजनेत सहभाग घेणा:या शेतक:यांना पूर्णपणे प्रशिक्षण देऊन बांबूचे फायदे व माहिती देण्यात येणार असल्याचे वनविभागाने म्हटले आह़े नंदुरबार जिल्ह्यात राबवल्या जाणा:या उपक्रमासाठी उपवनसंरक्षक एस़बी़केवटे, सहायक वनसंरक्षक ई़बी़चौधरी यांच्यासह जिल्ह्यातील वनविभागाचे अधिकारी परिश्रम घेत आहेत़
4बांबू लागवडीकरीता शेतक:यांना टिश्यू कल्चर बांबू रोपांचा पुरवठा केला जाणार असल्याची माहिती आह़े या रोपांची निर्मिती ही वनविभागाच्या जिल्ह्यातील विविध रोपवाटिकांमध्ये होणार आह़े शेतक:यांच्या मागणीनुसार आलेल्या अनुदानातून ही रोपे दिली जाणार आहेत़ उत्तम गुणधर्म असलेल्या रोपांची निर्मिती जिल्ह्यातच करुन योजना राबवण्याचे उद्दीष्टय़ विभागाने ठेवले आह़े यात त्यांना यश येईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े शेतजमिनीवर लागवड होणा:या या बांबू रोपांची सुरुवातीच्या काळात योग्य पद्धतीने वाढ व्हावी म्हणून वनविभाग शेतक:यांना मार्गदर्शन करणार आह़े निर्मिती झालेल्या बांबूचे उत्पादन येण्यास बराच कालावधी लागणार असल्याने अद्याप पूरक उद्योगांना बांबू विक्रीबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही़ या उपक्रमाचा शेतजमिनीला सर्वाधिक लाभ होणार असल्याचे सांगण्यात आले आह़े बांधावर लावलेले बांबू झाड जमिनीची धूप होण्यापासून वाचवून पाण्याचा स्त्रोतही जिवंत ठेवू शकतात़ सर्व सहा तालुक्यातील शेतक:यांनी वनविभागाच्या तालुकानिहाय कार्यालयात संपर्क केल्यानंतर नोंदणी करुन त्यांना झाडे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत़ पहिल्या टप्प्यात किमान दोन लाख बांबू रोपे लावली जाणार असल्याची माहिती आह़े