शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यात कापूस दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 19:51 IST

आॅनलाईन लोकमतनंदुरबार,दि.२० : कापूस दरांमध्ये एक हजार रूपयांची वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाची लहर पसरली असून सोमवारी दिवसभरात कापूस खरेदी केंद्रांवर एक हजार क्विंटल कापसाची आवक झाल्याची माहिती आह़े सकाळपासून केंद्रांवर शेतकऱ्यांच्या वाहनांची रांगा लागल्या होत्या़नंदुरबार तालुक्यातील पळाशी येथे नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीचे खरेदी केंद्र आह़े या केंद्रावर गेल्या 26 ...

आॅनलाईन लोकमतनंदुरबार,दि.२० : कापूस दरांमध्ये एक हजार रूपयांची वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाची लहर पसरली असून सोमवारी दिवसभरात कापूस खरेदी केंद्रांवर एक हजार क्विंटल कापसाची आवक झाल्याची माहिती आह़े सकाळपासून केंद्रांवर शेतकऱ्यांच्या वाहनांची रांगा लागल्या होत्या़

नंदुरबार तालुक्यातील पळाशी येथे नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीचे खरेदी केंद्र आह़े या केंद्रावर गेल्या 26 ऑक्टोबरपासून कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला होता़ याठिकाणी क्विंटलमागे चार हजार 600 दरांची घोषणा करण्यात आली होती़ मात्र कापसाच्या प्रतावारीनुसार शेतकऱ्यांना दर दिले जात होत़े याचदरम्यान सिसीआयच्या अधिकाऱ्यांनी खरेदी सुरू केली होती़ मात्र त्यांनी दोन दिवसांनी कापूस दरात आलेली घसरण आणि सरकीची विक्री थांबल्याने माघार घेत खरेदी बंद केली होती़ याचा परिणाम कापूस खरेदी केंद्राच्या उलाढालीवर होऊन गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात दरांची कापूस कोंडी निर्माण झाली होती़ रविवारी मात्र बाजार बंद असतानाही परवानाधारक व्यापाऱ्यांनी कापसाला वाढीव दर घोषित केल्यानंतर शेतकरी समाधान झाले होत़े हे समाधान सोमवारी उत्साहात परावर्तित होऊन कापसाची आवक वाढल्याचे बाजार समितीने नियुक्त केलेल्या चार परवानाधारक व्यापा:यांकडे दिसून येत होती़ ही आवक सायंकाळर्पयत वाढत असल्याने गेल्या दीड महिन्यात प्रथमच खरेदी केंद्राने गर्दी आणि कापसाच्या राशी अशा दोन्हींचा अनुभव घेतल्याचे चित्र दिसून आल़े कापूस कोंडी फुटल्याने शेतकऱ्यांची आर्थिक घडी सुस्थितीत येण्याची चिन्हे व्यक्त होत आहेत़