शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी तेल व वीजपंपापासून वंचित : आदिवासी प्रकल्प कार्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 11:30 IST

तळोदा : तळोदा आदिवासी विकास प्रकल्पामार्फत न्युक्लीअस बजेट अंतर्गत आदिवासी शेतक:यांना देण्यात येणा:या तेलपंप-वीजपंपाची योजना गेल्या तीन वर्षापासून रखडली असून, प्रत्यक्षात बहुसंख्य लाभार्थ्ीना ही यंत्रे मंजूरही झाली आहेत. तथापि त्यांना अजूनही देण्यात आलेली नाही. याबाबत आपल्यास्तरावर चौकशी करून योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी माजीमंत्री अॅड.पद्माकर वळवी यांनी केली ...

तळोदा : तळोदा आदिवासी विकास प्रकल्पामार्फत न्युक्लीअस बजेट अंतर्गत आदिवासी शेतक:यांना देण्यात येणा:या तेलपंप-वीजपंपाची योजना गेल्या तीन वर्षापासून रखडली असून, प्रत्यक्षात बहुसंख्य लाभार्थ्ीना ही यंत्रे मंजूरही झाली आहेत. तथापि त्यांना अजूनही देण्यात आलेली नाही. याबाबत आपल्यास्तरावर चौकशी करून योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी माजीमंत्री अॅड.पद्माकर वळवी यांनी केली आहे.याबाबत जिल्हाधिका:यांना निवेदन देण्यात आले असून, त्यात म्हटले आहे की, शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारीत असलेल्या आदिवासी विकास प्रकल्पामार्फत आदिवासींसाठी अनेक योजना राबविण्यात येत असतात. तळोदा आदिवासी विकास प्रकल्पामार्फत देखील आदिवासी शेतक:यांसाठी पी.व्ही.सी. पाईप, तेलपंप, वीजपंप, महिलांसाठी शिलाई यंत्र, घरघंटी अशा वेगवेगळ्या योजना             न्युक्लिअस बजेट अंतर्गत राबविण्यात येत आहेत. तथापि गेल्या तीन वर्षापासून ही योजना रखडली असल्याचे चित्र आहे. कारण योजनांसाठी तळोदा प्रकल्पाने लाभाथ्र्याकडून प्रस्तावदेखील मागविले होते. परंतु त्याची प्रभावी अंमलबजावणीअभावी लाभाथ्र्याचे हे प्रस्तावदेखील तसेच प्रलंबीत पडले आहेत. संबंधीत आदिवासी लाभार्थी आपल्या प्रस्तावाचा तपास करण्यासाठी सातत्याने प्रकल्पाकडे हेलपाटे मारत असतात. परंतु संबंधीत अधिकारी व कर्मचारी या लाभाथ्र्याना खोटे आश्वासन देवून परत पाठवीत असतात. साहजिकच लाभार्थी अतिदुर्गम भागातील अक्कलकुवा-धडगाव येथून येवून नाहक फजित होत असतो. यात त्यांचा वेळ तर वाया जातोच शिवाय पैसाही जातो.          एवढेच नव्हे तर बहुसंख्य आदिवासी शेतक:यांना तेलपंप व वीजपंप,  पाईप योजनेचे मंजुरीचे आदेश  देखील तत्कालीन प्रकल्प प्रशासनाने दिले आहेत. मात्र अजूनही त्यांना अजून पावेतो ही यंत्रे मिळाली नाही. वास्तविक यावर तातडीने कार्यवाही योजना लाभाथ्र्याना दिली पाहिजे होती. परंतु केवळ प्रकल्पाच्या उदासिन धोरणामुळे त्यांना योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. तळोदा बरोबरच नंदुरबार प्रकल्पातदेखील या योजनेची अंमलबजावणी होत नसल्याची आदिवासी शेतक:यांची तक्रार आहे. एकीकडे शासनाच्या आदिवासींसाठी अनेक योजना असतांना नंदुरबार जिल्ह्यातील या दोन्ही प्रकल्पात सन 2015-2016, 2016-2017, 2017-2018 अशा तब्बल तीन वर्षापासून योजना रखडल्याची स्थिती आहे. राज्यशासनानेही योजना बंद केली आहे. सुरु ठेवली आहे. यातही सुस्पष्टता नसल्याचे दिसून येते.  त्यामुळे योजनेबाबत प्रकल्पात अक्षरश: सावळा गोंधळ सुरू असून, याप्रकरणी आपल्यास्तरावर चौकशी करुन प्रभावी अंमलबजावणी करण्याची सक्त ताकीद द्यावी,               अशी मागणी करण्यात आली         आहे.