शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
5
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
6
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
7
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
8
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
9
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
10
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
11
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
12
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
13
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
14
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
15
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
18
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
19
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
20
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

शेतकरी अपघात विम्याचा लाभ केवळ पाच शेतक:यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 12:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्य शासनाने सुरू केलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात पाच मयत शेतक:यांचे वारसांना लाभ मिळाला आह़े  10 शेतक:यांचे प्रस्ताव नाशिक विभागाकडे प्रलंबित आहेत़ राज्य शासनाने तीन वर्षापूर्वी नव्या तरतूदींसोबत शेतजमीन नावावर असलेले किंवा सातबारा खातेदार असलेल्या शेतक:याचा अपघात किंवा इतर कारणास्तव अनैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्य शासनाने सुरू केलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात पाच मयत शेतक:यांचे वारसांना लाभ मिळाला आह़े  10 शेतक:यांचे प्रस्ताव नाशिक विभागाकडे प्रलंबित आहेत़ राज्य शासनाने तीन वर्षापूर्वी नव्या तरतूदींसोबत शेतजमीन नावावर असलेले किंवा सातबारा खातेदार असलेल्या शेतक:याचा अपघात किंवा इतर कारणास्तव अनैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना दोन लाख, कायमचे अपंगत्व आणि अवयव निकामी झालेल्यांना एक लाख रूपयांर्पयत लाभ देण्याची योजना आणली होती़ यात गेल्या वर्षात एकूण 17 शेतक:यांच्या वारसांनी पाठपुरावा करत कागदपत्रे दाखल केली होती़ यानुसार नाशिक विभागाने नियुक्त केलेल्या विमा कंपनीने पाच शेतक:यांच्या वारसांना प्रत्येकी 2 लाख रूपयांचा लाभ देत हातभार लावला आह़े  यंदाच्या वर्षातील प्रस्तावही नाशिक विभागाकडे पाठवण्यात आले आहेत़ डिसेंबर 2016- नोव्हेंबर 2017 या वर्षात माकत्या भोंग्या वसावे रा़ भोरकुंड ता़ अक्कलकुवा, रविंद्र दयाराम माळी रा़ भोणे ता़ नंदुरबार, माधव विठ्ठल भारती रा़ मोरवड ता़ तळोदा, रमेश हिरामण देवरे रा़ मंदाणा ता़ शहादा, किसन देवजी वसावे रा़ वराडीपाडा ता़ नवापूर या पाच शेतक:यांचा अपघाती मृत्यू झाला होता़ त्यांच्या वारसांनी कृषी विभागाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर त्यांना प्रत्येकी दोन लाख रूपयांचा विमा देण्यात आला आह़े ही रक्कम वारसांच्या धनादेश किंवा बँक खात्यात जमा करण्यात आली आह़े विविध कारणास्तव मयत झालेल्या शेतक:यांना देण्यात आलेल्या रकमेमुळे त्यांच्या कुटूंबियांची गार्डी मार्गाला लागली असून वर्षाच्या आतच त्यांना मदत दिल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आह़े मयताचा शवविच्छेदन अहवाल, मयत दाखल, वारसाचा दाखला, अपघात घडलेल्या जागेचा पंचनामा, पोलीस ठाण्यातील दाखल फिर्याद आदी कागदपत्रांच्या आधारे ही विमा रक्कम देण्यात येत़े कृषी विभागाकडून नाशिक येथील आयुक्त कार्यालयात हे प्रस्ताव देण्यात येतात़ तेथून जायका इन्शुरन्स ब्रोकेज या विमा कंपनीकडून शेतक:यांना लाभ देण्यात येत आह़े पाच शेतक:यांच्या वारसांना एकीकडे दोन लाख रूपयांचा लाभ मिळाला असताना त्यांच्यासोबतच्या 10 वारसांना अद्यापही फिरफिर करावी लागत आह़े 2017 मध्ये मयत झालेल्या कोत्या जेरम्या वळवी रा़ जांगठी ता़ अक्कलकुवा, दिनेश रणजितसिंग गिरासे रा़डोंगरगाव ता शहादा, मंग्या सु:या वळवी रा़ सल्लीबार ता़ अक्कलकुवा, अमर धर्मा पाटील रा़ विखरण ता़ नंदुरबार, रमेश काल्या वसावे रा़ ओरी ता़ अक्कलकुवा़ कर्मा जोधा वसावे रा़ रोजकुंड ता़ अक्कलकुवा, महेंद्र मुलादी वसावे रा़ वावडी ता़ नवापूर, ईरूबाई दुमडय़ा वळवी रा़ होराफळी ता़ अक्कलकुवा, नयूबाई अरूण गावीत रा़ बर्डीपाडा ता़ नवापूर व पुन्या खामल्या गावीत रा़ साकळीउमर ता़ अक्कलकुवा यांच्या वारसांनी कृषी विभागाकडे विविध कागदपत्रे सादर करून लाभ देण्याची विनंती केली होती़ 2018 उजाडूनही या शेतक:यांच्या वारसांना अद्याप पूर्ण विम्याचा लाभ मिळालेला नाही़