दुर्गम भागात बनावट दारूचा कारखानावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 01:12 PM2020-11-13T13:12:02+5:302020-11-13T13:12:49+5:30

  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  सातपुड्याच्या दुर्गम भागातील सिदीदिगर शिवारात देशी, विदेशी दारूचा कारखान्यावर धाड टाकून एलसीबीने एक ...

Fake liquor factory raided in remote areas | दुर्गम भागात बनावट दारूचा कारखानावर धाड

दुर्गम भागात बनावट दारूचा कारखानावर धाड

Next

  लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :  सातपुड्याच्या दुर्गम भागातील सिदीदिगर शिवारात देशी, विदेशी दारूचा कारखान्यावर धाड टाकून एलसीबीने एक लाख ३१ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.  याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुर्गम भागातील सिंदीदिगर येथे बनावट दारू तयार करण्याचा कारखाना असल्याची माहिती एलसीबीचे निरिक्षक विजयसिंग राजपूत यांना  मिळाली होती. त्यानुसार पथकाने त्या ठिकाणी धाड टाकली. पथकाने पहाटेच्या वेळी एका झोपडीत धाड टाकली. त्या ठिकाणी ६५ हजार ५२० रुपये किंमतीच्या काचेच्या बाटल्या, ५० हजार ८००रुपये किंमतीचे स्पिरीट, ४ हजार ६०० रुपये किंमतीचे बिअरचे टीन, पाच हजार रुपये किंमतीचे बाटली सील करण्याचे मशीन, दोन हजार रुपये किंमतीची बनावट दारू, हजार रुपये किमतीचे बूच व इतर साहित्य  असा एकुण एक लाख ३१हजार ३२० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. 
याप्रकरणी कालूसिंग पावरा व लालिसंग तेरसिंग नाईक, रा.सिंदीदिगर, ता.धडगाव यांच्याविरुद्ध म्हसावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरिक्षक विजयसिंग राजपूत, हवालदार रवींद्र पाडवी, सजन वाघ, विकास अजगे, जितेंद्र तांबोळी, विजय ढिवरे, अभय राजपूत यांच्या पथकाने केली. 

Web Title: Fake liquor factory raided in remote areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.