शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

दोन कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : गेल्या आठवडय़ात झालेल्या संततधार पावसामुळे तालुक्यात  सुमारे दोन कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : गेल्या आठवडय़ात झालेल्या संततधार पावसामुळे तालुक्यात  सुमारे दोन कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज  आहे. तालुक्यात लहान-मोठय़ा तीन हजार घरांचे नुकसान तर दोन  व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. सोमवारी पाऊस थांबल्याने जनजीवन पूर्वपदावर येत असून महसूल व कृषी विभागातर्फे नुकसानीचे पंचनामे करण्याच्या कामास गती आली  आहे.गेल्या आठवडाभर शहादा तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शहरासह संपूर्ण तालुक्याचे जनजीवन विस्कळीत झाले होते. सलग तीन दिवस संततधार झालेल्या पावसाने गोमाई नदीला दोनवेळा पूर आला. तालुक्यातील नद्या-नाले भरभरुन वाहू लागले. या पावसाने संपूर्ण तालुका जलमय होऊन तालुक्यात हाहाकार माजला.  दोन व्यक्तींसह तालुक्यात लहान-मोठी 40 जनावरे मृत्यूमुखी पडली तर सुमारे तीन हजार घरांची पडझड झाली. सुमारे साडेचार ते पाच एकर क्षेत्रातील शेतीत पावसाचे पाणी साचल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. एकंदरीत तालुक्यात सुमारे दोन कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.आठवडाभरानंतर शहादेकरांना सोमवारी सूर्यदर्शन झाले. पाऊस थांबल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून अजूनही शहरातील अनेक भागात पावसाचे पाणी साचले आहे. ज्या नागरिकांच्या घरात पाणी घुसले होते त्यांच्याकडून घराची साफसफाई सुरु झाली आहे. तालुक्यातील अनेक रस्त्यांची पावसामुळे दुरावस्था झाल्याने अजूनही तालुक्यातील रहदारी  सुरळीत झालेली नाही. पावसामुळे शहादा शहरातील रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे झाल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पालिका प्रशासनाने शहरातील रस्त्यांची डागडुजी करणे व साचलेले पाणी त्वरित काढणे आवश्यक आहे. अन्यथा साचलेल्या पाण्यामुळे शहरात साथीचे रोग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

4शहादा तालुक्यातील रायखेड येथे घराची भिंत पावसात कोसळून कलाबाई रायसिंग भिल या 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तर पाडळदे येथे सुखराम बाबुराव ठाकरे या 35 वर्षीय व्यक्तीचा तलावात बुडून मृत्यू झाला होता. या दोघांच्या कुटुबीयांना शासनातर्फे प्रत्येकी चार लाखाचे अनुदान देण्यात येणार आहे. 4शहादा तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतात पावसाचे पाणी साचल्याने उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील सुमारे साडेचार ते पाच हजार हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. सोमवारी पाऊस थांबल्याने महसूल व कृषी विभागातर्फे नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. 

कवळीथजवळील बंधारा फुटल्याने पाटचा:या बंद

शहादा : तालुक्यातील अनेक गावांना पाटचारीतून पाणी वाहून नेणा:या कवळीथ येथील ब्रिटिशकालीन बंधारा फुटल्याने तालुक्यातील पाटचारींचे पाणी बंद झाले. कवळीथ, ता.शहादा येथे सुकनाई, खापरी व गोमाई  नदीच्या संगमावर ब्रिटिशकालीन बंधारा आहे. सुमारे 300 फुट रुंद व 20 फुट उंच असलेल्या या बंधा:यात मोठय़ा प्रमाणात पाणी साठते. बंधा:याला एक मुख्य पाटचारी असून त्यापासून पुढे चार पाटचारीद्वारे डोंगरगाव,               सोनवद, कौठळ त.श, मोहिदा त.श, वरूळ कानडी,   टेंभे त.श., लोणखेडा, मलोणी, शहादा, कुकडेल,   मनरद, लांबोळा, करजई, बुपकरी, डामरखेडा या शिवारातील शेकडो एकर शेतीच्या सिंचनासाठी वापरले जाते. यासोबतच डोंगरगाव, सोनवद, वरूळ कानडी व मोहिदे येथील तलाव भरण्यासाठीही या पाण्याचा उपयोग होतो. सन 2013 मध्ये या बंधा:याच्या पाटचारींची दुरूस्ती करण्यात आली होती तर दोन वर्षापूर्वी बंधारा व पाटचारीतील गाळ काढण्यात आला होता. गेल्या आठवडय़ात झालेल्या जोरदार पावसाने गोमाई नदीला मोठा पूर आल्यामुळे पुराच्या प्रवाहात बंधा:यातील पाटचारीकडील सुमारे बारा फुट लांब व दहा फुट उंचीची दगडी भिंत वाहून गेली. त्यामुळे पाटचारींचे पाणी पूर्णत: थांबले आहे. बंधा:याच्या पाटचारींचा पाण्याचा प्रवाह बंद झाल्याने तालुक्यातील अनेक गावात आता भर पावसाळ्यात पाण्याचा प्रश्न निर्माण होईल. 2013 साली बंधा:याची दुरुस्ती झाली असताना अवघ्या पाच-सहा वर्षात बंधा:याची भिंत कोसळल्याने शेतक:यांनी बंधा:याच्या दुरूस्तीचे काम नित्कृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप केला आहे. 

मनरद व लांबोळा शिवारातील पिकांचेपाटचारीतील घाण पाण्यामुळे नुकसान

शहादा तालुक्यातील लांबोळा व मनरद येथील शेतात शहादा शहराकडून येणा:या पाटचारीचे घाण पाणी घुसून शेतीचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप शेतक:यांकडून होत आहे. गेल्या आठवडय़ात झालेल्या अतिवृष्टीने शहादा शहरातील पाटचारींचे पाणी शहराच्या वेगवेगळ्या भागात पसरले होते. वसाहतींमधील गटारी व साचलेले घाण पाणी पाटचारीतून पुढे  मनरद व लांबोळा येथील शेतात घुसल्याने शेतीचे मोठे नुकसान झाल्याची तक्रार अनेक शेतक:यांनी केली आहे. लांबोळा येथील दरबारसिंग रावल, योगेंद्रसिंग  रावल, राजेंद्र पाटील, गणेश पाटील, जशीबाई पाटील, परमानंद पाटील, कल्याण पाटील, घन:श्याम पाटील, रमण पाटील, काशिनाथ पाटील, सखाराम पाटील, जितेंद्र पाटील, पदम पाटील, रमेश पाटील, मोहन पाटील, सतीश पाटील, अंबालाल पाटील, दिलीप पाटील, सुदाम कोळी आदी शेतक:यांनी शेतीचे नुकसान झाल्याचा आरोप केला आहे.