शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
3
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
4
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा 'इतका' दर लावला
5
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
6
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
7
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
8
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
9
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
10
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
11
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
12
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
13
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
14
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
15
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
16
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
17
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
19
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
20
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
Daily Top 2Weekly Top 5

३५० हेक्टर केळी बागांच्या नुकसानीचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 12:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : शुक्रवारी आलेल्या वादळी पावसामुळे तळोदा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ३५० हेक्टर क्षेत्रावरील केळीच्या बागांचे नुकसान झाल्याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : शुक्रवारी आलेल्या वादळी पावसामुळे तळोदा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ३५० हेक्टर क्षेत्रावरील केळीच्या बागांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तवला असून रविवारपासून कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष पंचनाम्यांना सुरुवात केली आहे. असे असले तरी पंचनाम्यांचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून शासनाने तातडीने नुकसान भरपाई देण्याची अपेक्षा शेतकºयांनी व्यक्त केली आहे.शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास प्रचंड वादळी वाºयासह मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. या वादळामुळे बोरद, खरवड, मोड, खेडले, तºहावद, धानोरा, मोरवड, तळवे, आमलाड या पूर्व भागातील गावांमधील शेतकºयांच्या केळीच्या बागा अक्षरश: उद्ध्वस्त झाल्या आहेत. शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास आसमानी संकटाने हिरावून घेतला आहे. यात शेतकºयांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेक अल्पभूधारक शेतकºयांच्या केळीच्या बागाही नष्ट झाल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय काही पपईच्या बागादेखील आडव्या पडल्या आहेत. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार साधारण ३५० हेक्टर क्षेत्रावरील केळी पिकाचे नुकसान झाल्याचे अधिकाºयांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्वच प्रमुख लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली आहे. तळोदा कृषी कार्यालयाकडून शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही रविवारपासूनच करण्यात आली आहे. पंचनाम्यांची कार्यवाही कृषी विभागाने तात्काळ हाती घेतली असली तरी त्यास गती देण्याची अपेक्षा शेतकºयांकडून व्यक्त होत आहे.आमदारांकडून पाहणीआमदार राजेश पाडवी यांनी शनिवारी उपविभागीय अधिकारी अविशांत पांडा, तहसीलदार पंकज लोखंडे, गटविकास अधिकारी सावित्री खर्डे, तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले यांच्यासह मोड, बोरद, खरवड, मोरवड, आमलाड या गावांना भेट देऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. याशिवाय घरांच्या नुकसानीचीही पाहणी केली. पंचनाम्याचे काम त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना आमदार पाडवी यांनी संबंधित अधिकाºयांना दिल्या आहेत.बोरद परिसरातखासदारांकडून पाहणीतळोदा तालुक्यातील मोड, बोरद, खरवड, तºहावद, खेडले येथे वादळ व पावसामुळे पडझड झालेल्या घरांची व शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी रविवारी खासदार डॉ.हीना गावीत यांनी केली. वादळात ज्यांच्या घरांच्या नुकसान झाले आहे अशा बाधीतांची तात्पुरती सोय जि.प. शाळांमध्ये करण्याची सूचना खासदार डॉ.हीना गावीत यांनी केली. पडझड झालेली घरे व नुकसान झालेल्या शेतपिकांची पाहणी केल्यानंतर संबंधित विभागांना तातडीने पंचनामे पूर्ण करावेत व नुकसानग्रस्तांना मदत मिळवून द्यावी, असे सांगितले. खंडित झालेला वीजपुरवठा त्वरित दुरुस्ती करून सुरळीत करावा व ग्रामपंचातींनी जनरेटर लावून पाणीपुरवठा करण्याची सूचनाही त्यांनी केली. या वेळी पं.स.चे माजी सभापती जितेंद्र पाडवी, तहसीलदार पंकज लोखंडे, गटविकास अधिकारी सावित्री खर्डे, नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे, बांधकाम विभागाने शाखा अभियंता नितीन वसावे, वीज कंपनीचे सहायक कार्यकारी अभियंता सचिन काळे, तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले, सरपंच जयसिंग माळी, ग्रामविस्तार अधिकारी जाधव, शांतीलाल बावा, मंडळ अधिकारी माया मराठे, तलाठी अरुण धनगर यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.या वादळी पावसामुळे मोड, बोरद गावासह सरदार सरोवर प्रकल्पात बाधीत झालेल्या मोड पुनर्वसन, तºहावद, रेवानगर या वसाहतींमधील जवळपास शंभरावर घरांचे नुकसान झाले आहे. महसूल प्रशासनाने या नुकसानग्रस्त घरांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाहीही रविवारपासून सुरू केली असल्याचे बाधीतांनी सांगितले. या वादळात घरांचेही मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यातआले.वादळी पावसात नुकसान झालेल्या शेतकºयांच्या केळीच्या बागांचे नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले असून काम पूर्ण झाल्यानंतर अहवाल प्रशासनाकडे देण्यात येईल.-नरेंद्र महाले,तालुका कृषी अधिकारी, तळोदा.