शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा, दिवाळीत करा बंपर वस्तू खरेदी; जीएसटी लागणार कमी
2
आंदोलनाचा व्यापाराला १०० कोटींचा फटका, रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचा दावा 
3
आंदोलनामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार? प्रतिज्ञापत्र सादर करा, उच्च न्यायालयाचे निर्देश
4
पाकिस्तानी क्रिकेटरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, पोलिसांनी मैदानातून उचललं, कोर्टानेदिला निकाल
5
जीआर नव्हे, ही तर माहिती पुस्तिका, मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांची टीका
6
शाब्बास..! मुंबई पोलिस, महापालिका, तुम्ही संयम शिकवला !
7
ओबीसींमध्ये जीआरवरून तीव्र संताप, जीआरविरोधात कोर्टात जायची तयारी
8
मध्यरात्रीनंतर सोलार एक्सप्लोजिव्हमधील स्फोटांनी हादरले बाजारगाव, एकाचा मृत्यू : १६ कामगार जखमी, चौघे अत्यवस्थ
9
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
10
आजचे राशीभविष्य - ४ सप्टेंबर २०२५, आज यश, कीर्ती व आनंद लाभेल, नोकरीत सहकारी चांगले सहकार्य करतील
11
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
12
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
13
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
14
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
15
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
16
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
17
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
18
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
19
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
20
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...

धनखेडी येथे शासकीय जमिनीवर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 13:27 IST

सरदार सरोवर प्रकल्प : ग्रामस्थांना विश्वासात न घेता बुल्डोझरने सपाटीकरण सुरू

तळोदा : सरदार सरोवर प्रकल्पाच्या हद्दीतील धनखेडी, ता.अक्कलकुवा गावाजवळील शासकीय जमिनीवर गेल्या चार ते पाच दिवसांपासून बुल्डोझरने विनापरवानगी बेकायदेशीरपणे जमीन सपाटीकरण केले जात असल्याचा प्रकार पुढे आला असून, बुल्डोझर चालकास बाधितांनी हटकले. याप्रकरणी प्रशासनाने गंभीर दखल घेवून संबंधीतांवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्ण्याचा इशारा बाधितांनी दिला आहे.गुजरात मधील सरदार सरोवर प्रकल्पाजवळ गुजरात शासनाने सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारल्यामुळे साहजिकच पर्यटन स्थळदेखील नावारूपाला येत आहे. यामुळेच पर्यटन व्यवसायदेखील विकसीत होत आहे. या पाश्र्वभूमीवर बुडीत क्षेत्राजवळील सरदार सरोवर प्रकल्पाच्या जमिनीवरही अतिक्रमण वाढण्याचा प्रकार होत आहे. कारण गेल्या पाच ते सहा दिवसांपासून प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणा:या अक्कलकुवा तालुक्यातील धनखेडी गावाजवळ नर्मदेच्या पाण्याचा पातळीच्या 130 ते 136 मीटरच्या आत कुणीतरी इसम विनापरवानगी बेकायदेशीरपणे बुल्डोझरने                     जमीन सपाटीकरण करीत असल्याचा प्रकार बाधितांना दिसून आला. त्या वेळी या बाधितांनी त्यास मज्जावदेखील केला. ही  जमीन सद्या आम्ही खेडत आहोत. त्यामुळे आपण हे बुल्डोझर थांबवावे, असा सज्जड दमही चालकास भरला. वास्तविक ही जमीन शासनाच्या मालकीची म्हणजे वनविभागाच्या मालकीची आहे. शिवाय त्याबाबतचा वनअतिक्रमण धारकाचा वनदावादेखील सुरू आहे. विशेष म्हणजे जमिनीची जीपीएस मोजनी सुद्धा करण्यात आलेली आहे, असे असतांना या जमिनीवर बेकायदेशीरपणे बुल्डोझर सुरू आहे. तोही बिनभोबाटपणे सुरू असल्याने प्रशासन आणि वनविभागाच्या भूमिकेबाबत प्रकल्पबाधितांनी  सवाल उपस्थित केला आहे. विशेषत: हा बुल्डोझर या जमिनीवर आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या बोटीचा वापर केल्याचा आरोपही विस्थापितांनी केला आहे. एकीकडे नर्मदेच्या बुडीत क्षेत्रात बाधितांना घरे बांधून देत नाही, बांधकाम चालू असले तर तातडीने बंद करतात. याशिवाय साधा रस्ताही वनविभाग  काढू देत नाही, काढला तर आडवा पाय घालतात. मग गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सर्रास बुल्डोझर सुरू असतांना याकडे संबंधीतांनी का डोळे झाकपणा केला आहे, असा प्रश्न उपस्थित करून पोलिसांच्या बळाचा वापर करून त्यांना तेथून हुसकवले जात असते. यंत्रणेच्या या भूमिकेबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पर्यटनाच्या नावाखाली गुजरातमधील 72 गावांना विस्थापित करण्याचे षडयंत्र गुजरात सरकारने केले आहे. आता महाराष्ट्रात येवून येथील आदिवासींना हॉटेलात भांडी घासायला लावण्याचे काम देणार आहे. त्यामुळे आम्ही हे  कदापी सहन करणार नाही. काही पुढा:यांना हाताशी धरून बेकायदेशीरपणे परस्पर जमिनीवर बुल्डोझर चालवून सपाटीकरण केले जात आहे. म्हणजेच या ठिकाणी जमीन बळकावून                                                     हॉटेल व्यवसाय सुरू करण्याचा                             घाट रचला जात असल्याने प्रशासनाने याप्रकरणी गंभीर दखल घेवून संबंधीतांवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नर्मदा आंदोलनाचे कार्यकर्ते सिताराम पाडवी, चेतन साळवे, नुरजी पाडवी, भिमसिंग वसावे, लतिका राजपूत, रायसिंग वसावे, शामसिंग वसावे, सिताराम पाडवी यांनी दिला आहे.