शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

खांडबारा येथे अतिक्रमणाच्या वादातून जमावाची मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 12:14 IST

विसरवाडी पोलीसात गुन्हा : खांडबारा येथे झाली घटना

ठळक मुद्देमारहाणीदरम्यान अरेबियानी परिवारातील सदस्यांपैकी एकाच्या हातात गावठी कट्टा असल्याचे दिसून आले होत़े तलवार, गुप्ती, कोयता, लोखंडी सळई व लाकडी काठय़ांद्वारे तिघांना मारहाण करण्यात आल्याने तिघे गंभीर जखमी झाले आहेत़ यावेळी जमावाने दुकानातील 25 हजार रूपये काढून

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे शासकीय जागेतील अतिक्रमण काढण्यासाठी तक्रार केली़ यातून अतिक्रमण काढले गेल्याचा राग धरून जमावाने तिघांना बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली़ बुधवारी रात्री उशिरा याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला़  हाजीभाई व तय्यब अरेबियानी यांनी खांडबारा ग्रामपंचायतीच्या मालकीच्या बर्डीपाडा भागातील जागेवर अतिक्रमण करून घराचे कंपाउंड बांधकाम केले होत़े याविरोधात फारूख युसूफ मेमन यांनी   नवापूर तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल केला होता़ यामुळे 10 महिन्यांपूर्वी हे अतिक्रमण काढण्यात आले होत़े याचा राग मनात धरून बुधवारी दुपारी रियाज हाजीभाई अरेबियानी, इलियास हाजीभाई अरेबियानी, जुबेर हाजीभाई अरेबियानी, हाजीभाई ईब्राहिमभाई अरेबियानी, तय्यब हबीब अरेबियानी, फिरोज तय्यब अरेबियानी, अल्ताफ तय्यब मेमन, रफिक हारूण मेमन, आदिल रफिक मेमन, दानिश रफिक मेमन, साहिस्ताबी आदिल मेमन, अफसानाबी जुबेर मेमन, तबस्सुम अल्ताफ मेमन, यास्मिन रियाज मेमन, ईरफानाबी ईलियास मेमन, हमिदाबी तय्यब मेमन यांनी विविध हत्यारे घेत खांडबारा गावातील मेमन यांच्या दुकानावर हल्लाबोल केला होता़ यावेळी दुकानात हजर असलेले फारूख युसूफ मेमन, उस्मान युसूफ मेमन व यासिन मेमन या तिघांना बेदम मारहाण करण्यात आली़ दरम्यान हाजीभाई अरेबियानी यांनी फारूख मेमन याच्या गुप्तांगावर लाथ मारून गंभीर जखमी केल़े याबाबत फारूख मेमन यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून 16  संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े जखमींवर उपचार सुरू आह़े