शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

कोविड केअर सेंटरमुळे रोजगार; परंतु इन्शुअरन्सअभावी होताहेत बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:24 IST

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची शुश्रूषा व त्यांच्यावर उपचार करण्यासाठी १० कोविड केअर सेंटर्स सुरू करण्यात आली आहेत. या ...

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची शुश्रूषा व त्यांच्यावर उपचार करण्यासाठी १० कोविड केअर सेंटर्स सुरू करण्यात आली आहेत. या सेंटर्सवर तातडीने कंत्राटी कर्मचारी भरती माेहीमही गेल्या महिन्यात राबविण्यात आली आहे. दरम्यान, तीन महिन्यांसाठी नियुक्ती झालेल्या या कर्मचाऱ्यांच्या आरोग्य विमा संरक्षणाचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयासह नवापूर, तळोदा, शहादा याठिकाणी आता ऑक्सिजन बेडची सुविधा झाली आहे. यातून १० ठिकाणी कोविड सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. नंदुरबार येथे दोन, तर शहादा, तळोदा, धडगाव, अक्कलकुवा, प्रकाशा, नवापूर याठिकाणी एक, अशा एकूण १० ठिकाणी कोविड केअर सेंटर्स सुरू आहेत. याठिकाणी २२२ जण सध्या उपचार घेत आहेत, तर जिल्हा रुग्णालय व इतर रुग्णालयांत साधारण सात हजारांच्या जवळपास रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. खाजगी रुग्णालयात सध्या स्टाफ असल्याने तेथील अडचणी कमी आहेत; परंतु शासकीय रुग्णालयात कर्मचारी संख्या अपुरी असल्याने तीन महिन्यांसाठी वैद्यकीय अधिकारी व कंत्राटी परिचारिका व परिचर यांची नुकतीच भरती करण्यात आली होती. या भरतीतून सुमारे ५० परिचर व परिचारिका कोविड सेंटर्सला मिळाले आहेत; परंतु कर्तव्याला सुरुवात करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण गरजेचे असताना शासनाकडून मात्र ते देण्यात आलेले नसल्याचे दिसून आले आहे. विशेष बाब म्हणजे येत्या १५ दिवसांत ९६ कंत्राटी परिचर व परिचारिकांची भरती होणार असल्याने त्यांचे काय, असाही प्रश्न कर्मचारी आरोग्य विभागासमोर उपस्थित करीत आहेत.

शासनाने संरक्षण द्यावे

नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना विमा संरक्षित करण्याची जबाबदारी ही संपूर्णपणे शासनाची आहे. याबाबत शासन काही निर्णय घेणार किंवा कसे याकडे लक्ष लागून आहे.

१३ युनानी डाॅक्टर्सची सेवा

तीन महिन्यांसाठी करण्यात आलेल्या भरतीत १३ युनानी डाॅक्टर्स नियुक्त झाले आहेत.

५९ जीएनएम, एक औषधनिर्माण अधिकारी, आठ वाॅर्डबाॅय यांची भरतीही करण्यात आली आहे. हे सर्व कर्मचारी सध्या कोविड केअर सेंटर्सवर सेवा देत देत आहेत.

दरम्यान, जिल्हा आरोग्य विभागाकडून कोविड लसीकरणासाठी २४ आरोग्यसेविका नियुक्त करण्यात आल्या आहेत. या सेविका त्या-त्या केंद्रांवर नियुक्त झाल्या आहेत.

कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन व इतर सुविधा देण्यावर भर देण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यांना कोरोनाची लागण होणार नाही यासाठी दक्षता घेत सुरक्षा व्यवस्थाही पुरविण्यात आली आहे.

रुग्णांच्या सेवेसाठी ही सेवा स्वीकारली आहे. वेतन व इतर बाबी चांगल्या असल्या तरी विमा संरक्षण नसल्याने चिंता आहे; परंतु आपण जे शिक्षण घेतले ते काम करण्याचे समाधान आहे. शासनाने तूर्तास विमा संरक्षण दिल्यास मोठा दिलासा मिळणार आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे.

-कंत्राटी जीएनएम, शहादा, सीसीसी

आरोग्य विभागात काम करण्याची संधी मिळाल्याने कामावर येत आहे. वेतन चांगले देण्यात येत आहे. पुढे शासकीय सेवेत सामावून घेतले पाहिजे अशी अपेक्षा आहे. प्रशासनाने याकडे लक्ष दिले पाहिजे. आम्ही आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलेली कामे प्रामाणिकपणे पार पाडतो आहोत. शासनाने विमा संरक्षण देण्याची अपेक्षा आहे.

-कंत्राटी परिचर, नंदुरबार सीसीसी,

आरोग्य विभागाने योग्य ती संधी दिली आहे. यापुढेही काम करण्याची तयारी आहे. कोरोनाची लागण होऊन एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाचे काय असा, प्रश्न आहे. यामुळे आरोग्य विभागाने शासनाकडे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे आतापासून लक्ष देत त्यांना विमा संरक्षण दिले पाहिजे.

-कंत्राटी आरोग्य सेवक, नंदुरबार,

स्वयंस्फूर्तीने सहभागी

जिल्हा आरोग्य विभागाकडे अर्ज करणाऱ्या युनानी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह जीएनएम वाॅर्डबाॅय म्हणून तीन महिन्यांसाठी कामावर आलेले सर्वच युवा आहेत. त्यांनी स्वयंस्फूर्तीने ही जबाबदारी स्वीकारल्याचे सांगण्यात आले आहे. यातील अनेक जण प्रथमच कामाला सुरुवात करीत आहेत. यातून त्यांच्या कामाचा उत्साह असल्याचे सांगण्यात येत आहे.

नियुक्त कर्मचारी कोरोनामुक्त

नियुक्त करण्यात आलेल्या बहुतांश कर्मचाऱ्यांना प्रथम लस देण्यात येऊन ड्यूट्या देण्यात आल्या आहेत. त्यांना सीसीसी सेंटर्सवर कामे सोपविण्यात आली आहेत. यातील एकालाही कोरोनाची लागण झालेली नसल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.