शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
5
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
6
Operation Sindoor Live Updates: भारताचा कोणताही शत्रू वाचू शकत नाही, अमित शाहांची पोस्ट
7
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
8
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
9
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
11
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
12
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
13
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
14
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
15
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
16
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
17
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
18
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
19
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
20
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?

मजुरांना काम न दिल्यास रोजगार भत्ता

By admin | Updated: March 22, 2017 23:33 IST

जिल्हा परिषद स्थायी समिती : मागेल त्याला काम उपलब्ध होत नसल्याची तक्रार

नंदुरबार : रोजगार हमीच्या कामांबाबत दुर्गम भागात नाराजी आहे. मजुरांची संख्या अगदीच कमी आहे. येत्या काळात कामाची मागणी वाढणार असून त्यादृष्टीने नियोजन करण्याची मागणी जिल्हा परिषद स्थायी समिती सभेत सदस्यांनी केली. दरम्यान, मागेल त्याला काम देण्यात येत असून काम न मिळाल्यास रोजगार भत्ता देण्यात येत असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एम. मोहन यांनी दिली.जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा अध्यक्षा रजनी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मोहन यांच्यासह सभापती दत्तू चौरे, आत्माराम बागले, हिराबाई पाडवी, लताबाई पाडवी यांच्यासह स्थायी समितीचे सदस्य किरसिंग वसावे, सीताराम राऊत, रतन पाडवी, सागर धामणे आदी उपस्थित होते. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.सध्या परराज्यात गेलेले मजूर परतू लागले आहेत. त्यांना स्थानिक ठिकाणी काम उपलब्ध होण्यासाठी प्रय} होणे आवश्यक आहेत. त्यासाठी रोजगार हमी योजनेच्या कामांचे नियोजन करावे, अशी मागणी रतन पाडवी यांनी केली. अनेकांना मागणी करूनही कामे मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. काही कामांची तपासणी करण्याची मागणीही सीताराम राऊत यांनी केली. त्यावर मोहन यांनी सांगितले, रोजगार हमी योजनेअंतर्गत मागेल त्याला कामे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सेल्फवरील कामांची संख्या मोठय़ा प्रमाणावर आहे. मागणी केल्यास स्थानिक स्तरावर काम उपलब्ध करून देण्याचा प्रय} असतो. काम मिळालेच नाही तर रोजगार भत्ता दिला जातो. असे असले तरी गटविकास अधिका:यांना सूचना देऊन याबाबत अधिक दक्ष राहण्याचे त्यांनी सांगितले.सध्या धडगाव, नंदुरबार व नवापूर तालुक्यात 141 कामांवर एक हजार 723 मजूर कामावर आहेत. त्यात धडगाव तालुक्यात 45 कामांवर 570 मजूर, नंदुरबार तालुक्यात 30    कामांवर 367 तर नवापूर      तालुक्यात 15 कामांवर 175 मजूर कार्यरत असल्याचेही मोहन यांनी स्पष्ट केले.14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून होणा:या कामांबाबत   या वेळी चर्चा करण्यात आली. पाच वर्षाचा आराखडा तयार करण्यात    येत आहे. पंचायत समितींकडून त्याबाबत नियोजन मागविण्यात येत असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.बोगस डॉक्टर शोध मोहीमजिल्ह्यात बोगस डॉक्टर शोध मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी 15 मार्च ते 15 एप्रिल हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. याअंतर्गत दवाखान्यांची तपासणी करण्यात येत आहे. दवाखान्यांचे  रेकॉर्ड तपासणी करण्यात येत       आहे. आतार्पयत एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्यवाहीचा वेळोवेळी आढावा घेण्यात येत असल्याची माहितीही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पवार यांनी दिली.बैठकीत इंदिरा आवास योजना, विहिरींची कामे, आरोग्य यासह इतर विषयांवरही चर्चा करण्यात आली. सर्व विषय समितींचा आढावा त्या त्या विभाग प्रमुखांकडून घेण्यात आला. या वेळी सर्व विभागप्रमुख उपस्थित         होते.    बैठकांची केवळ औपचारिकता?गेल्या दोन ते तीन बैठकांपासून जिल्हा परिषदेच्या सभांमध्ये फारशी चर्चा होत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील सर्वच प्रश्न व समस्या सुटल्या की काय? असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. याआधी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे फारशी चर्चा होत नव्हती. आता काहीही तांत्रिक अडचणी नसताना फारसे प्रश्न उपस्थित होत नाहीत. चर्चा होत नाहीत. सर्वसाधारण सभा अवघ्या 23 मिनिटात आटोपते तर स्थायी समिती सभा अर्धा तासाच्या आत आवरती घेण्यात येते. बुधवारी झालेली सभादेखील अवघ्या 17 व्या मिनिटाला आटोपती घेण्यात आली. त्यामुळे बैठकांची केवळ औपचारिकता उरली आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.