शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

अपहार करणाऱ्या लिपीकास एक वर्ष कैद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2020 12:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : तहसीलदाराचे खोटे देयक तयार करून २९ लाखांचा अपहार करणाऱ्या उप कोषागार कार्यालयातील कनिष्ठ लिपिक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : तहसीलदाराचे खोटे देयक तयार करून २९ लाखांचा अपहार करणाऱ्या उप कोषागार कार्यालयातील कनिष्ठ लिपिक इंदल महारु जाधव (बंजारा)  यास चार वर्षे शिक्षा व चार हजार रुपये दंड तर बँक कर्मचारी विनय किशनसिंह रावत यास एक वर्ष शिक्षा व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा दिली. जिल्हा सत्र न्यायालयाने आज या खटल्याची सुनावणी केली.      न्या.व्ही.जी. चव्हाण यांनी हा निकाल दिला. अशी माहिती पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी दिली. नवापूर शहरातील उपकोषागार कार्यालयातील कनिष्ठ लिपिक इंदेलसिंग महारू जाधव (बंजारा) यानी ११ जून २०१८ रोजी उप कोषागार कार्यालयातील संगणक प्रणालीत तहसीलदार नवापूर यांचे खोटे देयक तयार करून त्यात खाडाखोड करून स्वतःचे नाव टाकून बँकेच्या सुचना पत्रकावर उप कोषागार अधिकारी नवापूर यांच्या खोट्या स्वाक्षरी केली होती. बॅकेचे सुचना पत्रक भारतीय स्टेट बँकच्या नवापूर शाखेत सादर करून शासनाच्या तिजोरीतून २९ लाख रूपये स्वताच्या खात्यात जमा करून घेतले होते. इंदल जाधव हा कनिष्ठ लिपिक असून त्यास नवापूर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. इंदेलसिंग महारू जाधव (बंजारा) याच्या विरोधात अप्पर कोषागार अधिकारी प्रकाश बांधकर यांनी दिलेल्या फिर्यादिवरून नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोबत स्टेट बँक प्रशासन विरुद्ध हि तक्रार दिली आहे. कसा झाला प्रकारजाधव यांनी त्यांच्या खात्यात जमा झालेले एकूण २९ लाख  रुपयांमधून त्यांनी ११ जून २०१८ रोजी एटीएम मधून ४० हजार रूपये काढले. त्यानंतर १२ जून २०१८ रोजी बँकेच्या खिडकी वरून २५ लाख रूपये व त्याच दिवशी एटीएम मधून ४० हजार काढले. असे २५ लाख ८० हजार रूपये काढून घेतले. उर्वरित रक्कम त्यांच्या खात्यावर जमा आहेत. दोन दिवसानंतर बँकेच्या अहवाल आल्याने उप कोषागार संजय गोविंद साळी यांनी कागद पत्रांची तपासणी करीत असतांना २९ लाखांचा अपहार झाल्याचे लक्षात आले. काढलेल्या रकमेपैकी तीन लाख ६६ हजार कमी आढळून आले. उर्वरित रक्कमेचे खाते बंद केले आहे. त्यावरून नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  तपास पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, पोलिस हेड कॉनस्टेबल दिलीप चौरे, जितेंद्र तोरवणे, योगेश थोरात, शांतीलाल पाटील, महेश पवार यांनी केला.