रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ.सुहास नटावदकर यांनी ऐनवेळी पक्षातर्फे व अपक्ष म्हणूनही उमेदवारी अर्ज भरून पक्षातील अंतर्गत धूसफूसीला कोंडी फोडल्याने बंडाचा ङोंडा रोवला आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्यास आता अवघे 24 तास शिल्लक असून रात्रभरात पक्ष त्यांची नाराजी कशी दूर करेल याकडे सर्वाचे लक्ष लागून आहे. नंदुरबार लोकसभा मतदार संघात गेल्या 70 वर्षात प्रथमच गेल्या निवडणुकीत भाजपला विजय मिळाला आहे. या विजयाची परंपरा टिकविण्यासाठी पक्षातर्फे सर्वपरी प्रयत्न सुरू आहेत. सुरुवातीला उमेदवारी जाहीर करतांना कार्यकत्र्यामध्ये नाराजी दूर करून पुनश्च विद्यमान खासदार डॉ.हिना गावीत यांच्या नावावर पक्षाने व कार्यकत्र्यानीही एकमत केले. परंतु निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच पक्षातील जुने व नवे कार्यकत्र्याचा वाद सुरू झाला. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या पूर्वसंध्येर्पयत एका गटातर्फे भाजपचा उमेदवारच बदलण्यासाठी प्रय} सुरू होते. या संशयाच्या वातावरणात अर्ज भरण्यासाठी मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री जयकुमार रावल आल्याने डॉ.हिना गावीत याच भाजपच्या उमेदवार राहतील यावर त्यांनी शिक्कामोर्तब केले. परंतु त्यानंतरही पक्षाअंतर्गत धूसफूस सुरूच राहिली. कारण उमेदवारी अर्ज भरतांना जिल्ह्यातीलच भाजपचे आमदार उदेसिंग पाडवी हे अनुपस्थित होते. डॉ.हिना यांचा अर्ज भरल्यानंतर तासाभरांनीच पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ.सुहास नटावदकर यांनी अर्ज भरला. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत यापूर्वी याच मतदारसंघातून चारवेळा भाजपतर्फे निवडणूक लढविणारे कुवरसिंग वळवी होते. पक्षाचे माजी आमदार डॉ.नरेंद्र पाडवी हे देखील होते.अर्ज छाननीत डॉ.नटावदकर यांचा पक्षाचा एबी फॉर्म नसल्याने अर्ज अवैध ठरला, पण अपक्ष म्हणून भरलेला अर्ज कायम असल्याने आता पक्षासाठी ती डोकेदुखी ठरली आहे. गेल्या दोन दिवसात डॉ.नटावदकर यांनी आपल्या भुमिकेवर ठाम राहत माघार घेतलेली नाही. पक्षाचे नेते व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकत्र्याकडूनही माघारीसाठी प्रय} सुरू आहे. परंतु डॉ.नटावदकर भुमिकेवर ठाम असून बाहेर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. शुक्रवारी अर्ज माघारीची शेवटच मुदत असल्याने गुरुवारी रात्री काय राजकारण शिजते यावरच सर्व अवलंबून आहे. त्यांच्या मनधरणीसाठी रात्री काही मंत्री नंदुरबारात डेरेदाखल होत असल्याची चर्चा असून रात्रीच्या खेळीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
नटावदकरांची नाराजी दूर करणे भाजपपुढे आव्हानच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 12:19 IST