शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभरात भाजपचे एल्गार आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 13:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्यात सत्तेत आलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्यात सत्तेत आलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून याच सरकारच्या काळात राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले असल्याचा आरोप करत भाजपने जिल्हाभर एल्गार आंदोलन केले़ या आंदोलनात भाजपच्या राज्य, जिल्हा आणि तालुका पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती देत धरणे दिले़ सकाळी ११ वाजेपासून हे आंदोलन सुरु झाले होते़नंदुरबार तहसील कार्यालयामोर भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनात आंदोलन करण्यात आले़ यावेळी भाजप नेते राजेंद्रकुमार गावीत, नगरसेवक प्रशांत चौधरी, प्रदेश सदस्य सुदाम चौधरी, शहराध्यक्ष नरेंद्र माळी, पंचायत समिती उपसभापती लताबाई पाटील, जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र पाटील, पंकज पाठक, नगरसेवक कमल ठाकूर, माणिक माळी, अशोक चोधरी, जितेंद्र गोसावी, योगेंद्र गिरासे, विजय नाईक, दिनेश मोहिते, पंढरीनाथ पाटील, डिगंबर पाटील, ज्ञानेश्वर पाटील, डॉ़ सपना अग्रवाल, नगरसेविका संगिता सोनवणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला होता़यावेळी जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्यासह पदाधिकाºयांनी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन दिले़ निवेदनात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अवकाळीमुळे नुकसानग्रस्तांना २५हजार रुपये हेक्टरी व फळबागांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली होती़ परंतू प्रत्यक्षात आठ हजार पेक्षा एका रुपयाचीही अधिक मदत दिलेली नाही़ सरसकट कर्जमाफी, सातबारा कोरा करु अशा घोषणा करुनही आश्वासन पाळले नाही़ तसेच या सरकारच्या काळात हिंगणघाटसारख्या गंभीर घटना घडून महिलांवरचे अत्याचारही वाढले असल्याचे सांगून घोषणाबाजी केली़दरम्यान अक्कलकुवा येथे प्रदेश सदस्य नागेश पाडवी यांच्यासह मार्गदर्शनात आंदोलन करण्यात आले़ पाडवी यांनी तहसील कार्यालयात जाऊन मागण्यांचे निवेदन दिले़तळोदा येथे भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ शशिकांत वाणी, नगराध्यक्ष अजय परदेशी, उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र राजपूत, तालुका अध्यक्ष यशवंत पाडवी, पंचायत समिती सभापती यशवंत ठाकरे, प्रा़ विलास डामरे, जिल्हा युवा उपाध्यक्ष आनंद सोनार, अनुपकुमार उदासी, जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ कलाल, भाजपा शहराध्यक्ष योगेश चौधरी, तालुका अध्यक्ष यशवंत पाडवी, बळवंत पाडवी, शिरीष माळी, दीपक चौधरी, नगरसेवक योगेश पाडवी, नगरसेवक रामा ठाकरे, पंचायत समिती सदस्य विजय राणा, राजू पाडवी, दाज्या पावरा, रसीलाबाई देसाई, भारती कलाल, रसिकलाल वाणी, राजू पाडवी, गोकुळ मिस्तरी, लता शुक्ला यांनी आंदोलनात सहभाग नोंदवला़शहादा तहसील कार्यालयामोर भाजपचे शहादा शहराध्यक्ष अतुल जयस्वाल, पालिका गटनेते प्रा. मकरंद पाटील, जिल्हा परिषद सदस्य धनराज पाटील, पंचायत समिती सदस्य गणेश पाटील, हेमराज पवार, दिनेश खंडेलवाल, संतोष वाल्हे, संजय साठे, यशवंत चौधरी, संजय चौधरी, लक्ष्मण बढे, विनोद जैन, जयेश देसाई यांच्यासह महिला आघाडीच्या प्रा. कल्पना पंड्या, अनामिका चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी मंडळ अधिकारी अमृतकर यांनी निवेदन स्वीकारले.