शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
5
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
6
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
7
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
8
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
9
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
10
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
11
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
12
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
13
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
14
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
15
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
16
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
17
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
18
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
19
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
20
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला

आठ हजार भावी मास्तर देणार आज टीईटी प्रवेश परीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 12:08 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : भावी आठ हजार मास्तर रविवारी टीईटीची प्रवेश परिक्षा देणार आहेत. यापूर्वी या परीक्षेतील मॅजीक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : भावी आठ हजार मास्तर रविवारी टीईटीची प्रवेश परिक्षा देणार आहेत. यापूर्वी या परीक्षेतील मॅजीक पेन, गुणांची हेराफेरी असले गैरप्रकार लक्षात घेता यावेळी तसे प्रकार रोखण्यासाठी धडक कृती पथक तैणात राहणार आहे. नंदुरबारातील २३ केंद्रांवर ही परीक्षा घेतली जात असून परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले असल्याची माहिती परीक्षा समन्वयक तथा जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी दिली.शिक्षकाच्या नोकरीसाठी टीईटी परीक्षा पास होणे सक्तीचे करण्यात आले आहे. जे सेवेत आहेत त्यांनाही ठराविक कालावधीत टीईटी परीक्षा पास होणे आवश्यक आहे. यासाठी ही परीक्षा प्रत्येक जिल्हा केंद्रावर घेण्यात येते. यावेळी ही परीक्षा रविवार, १९ रोजी होत आहे. नंदुरबार शहरातील २३ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होत आहे. दोन सत्रात ही परीक्षा होत आहे. पहिल्या सत्रात १२ केंद्र तर दुसऱ्या सत्रात ११ केंद्र राहणार आहेत. या केंद्रामध्ये डॉ. काणे गर्ल्स हायस्कुल, श्रीमती हि.गो. श्रॉफ हायस्कुल-अ, श्रीमती हि.गो. श्रॉफ हायस्कुल-ब, अँग्लो उर्दु हायस्कूल, अभिनव विद्यालय, महात्मा फुले हायस्कुल, जिजामाता कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, अण्णासाहेब पी.के. पाटील माध्यमिक विद्यालय, जी.टी.पी. कॉलेज, दुगार्बाई रघुवंशी हायस्कुल, कमला नेहरु कन्या विद्यालय व एस. ए. मिशन हायस्कुल या परिक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. दुसरा पेपर राजे शिवाजी विद्यालय, यशवंत हायस्कुल, स्वामी विवेकानंद हायस्कुल, एन.टी.व्ही.एस.बी.एङ कॉलेज, मोहनसिंग के. रघुवंशी प्राथमिक शाळा, पोद्दार इंटरनॅशनल स्कुल, नॅशनल गर्ल्स हायस्कुल, चावरा इंग्लिश स्कुल, दुगार्बाई रघुवंशी हायस्कुल, कमला नेहरु कन्या विद्यालय व एस.ए. मिशन हायस्कुल या परिक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे.यंदा परीक्षेसाठी आठ हजार परिक्षार्र्थींची नोंद करण्यात आली आहे. पहिल्या सत्रात चार व दुसºया सत्रात चार हजार असे एकुण आठ हजार परिक्षार्र्थींची सोय करण्यात आली आहे. उशीराने येणाºया परिक्षार्र्थींना प्रवेश नाकारण्यात येणार आहे.परीक्षेचे समन्वय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड असून सहसमन्वय अधिकारी म्हणून जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित राहणार आहेत. समितीत प्राथमिक शिक्षणाधिकारी माळी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.परीक्षा केंद्राच्या २०० मिटर परिसरात प्रवेश करण्यास मनाई आहे. तसेच या परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर, सार्वजनिक टेलिफोन, एस.टी.डी., आयएसडी, फॅक्स केंद्र, ध्वनीक्षेपके बंद ठेवण्याबाबत आदेशीत करण्यात आले आहे.

गैरप्रकार केल्यास खबरदार... परिक्षेत गैरप्रकार केल्यास धडक पथकातर्फे कारवाई करण्यात येणार आहे. गेल्यावेळी काही दलालांनी परिक्षार्र्थींकडून पैसे घेवून उत्तीर्ण करून देण्याचे अमिष दाखविले होते. त्यासाठी मॅजीक पेन व इतर मार्गाचा अवलंब करण्यात आला होता. याबाबत तक्रारीही झाल्या होत्या. त्यामुळे यावेळी अशा दलालांना दूर ठेवण्यासाठी प्रशासनाने थेट कारवाईचा ईशारा दिला आहे.