लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शालेय विद्यार्थ्यांसाठी स्वामी विवेकानंद हायस्कूलमध्ये सबज्युनियर जिल्हास्तर आमंत्रित खो-खो स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत आठ शाळांमधील खेळाडूंनी सहभाग घेतला.स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष गुलाब महाजन, सुनील सुर्यवंशी, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त बलवंत निकुंभ, मुख्याध्यापक एन.जी. भावसार, निंबा माळी, निरंजन करनकाळ, ईरशात जहागीरदार, नवाब शेठ मिर्झा यांच्यासह अन्य शिक्षक उपस्थित होते.यावेळी रघवंशी यांनी मैदानी खेळामुळे विद्यार्थ्यांना अनेक संधी मिळत असल्याने याकडे वळावे, असे आवाहन केले. तर मैदानी खेळातून शालेय विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात विविध पदांवर संधी निर्माण करता येते. मोबाईल खेळ खेळण्यापेक्षा मैदानी खेळ खेळावे, त्यातून शारीरिक क्षमता व बौद्धिक क्षमता वाढण्यास चालना मिळते, असे मत व्यक्त करीत गुलाब महाजन यांनीही विद्यार्थ्यांना या खेळांकडे वळण्याचे आवाहन केले.या स्पर्धेत बिलमांजरे, धनराट, भरडू, जळखे, अमलांड आंतरराष्ट्रीय निवासी विद्यालय, तोरणमाळ, जीवनगौरव डनेल या शाळांच्या संघांनी भाग घेतला. सर्वच सामन्यात मोठी चुरस दिसून आली. या स्पनर्धेसाठी राष्टÑीय दर्जाचे पंच म्हणून वसंत गावीत, हरिष पाटील, करण चव्हाण, विशाल सोनवणे, कुमार वळवी, रेखा वळवी, जितेंद्र माळी यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल रौंदळ यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. मयूर ठाकरे यांनी केले. उपस्थितांचे आभार जितेंद्र पगारे यांनी मानले.
जिल्हास्तर आमंत्रित खो-खो स्पर्धेत आठ शाळांनी घेतला सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 11:41 IST