शहरं
Join us  
Trending Stories
1
लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
2
"INS विक्रांतच्या नावानेच पाकिस्तानची झोप उडवली होती.."; पंतप्रधान मोदींकडून गौरवोद्गार
3
ऐन दिवाळीत सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; एका झटक्यात चांदी ९ हजारांनी स्वस्त, सोन्याची नवी किंमत काय?
4
‘रो-को’चा फ्लॉप शो! गावसकर म्हणाले, "पुढे दोघांनी ही गोष्ट केली तर आश्चर्यचकित होऊ नका!"
5
‘...म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची त्यांच्या सासऱ्यांनी हत्या केली’, बच्चू कडूंचं धक्कादायक विधान  
6
वार्षिक भविष्य २०२५-२६: महालक्ष्मी कृपेने पुढील वर्षभर कोणत्या राशींना धन, यश आणि भाग्याची साथ?
7
'वॉर २'च्या अपयशानंतर अयान मुखर्जीने 'धूम ४'च्या दिग्दर्शनातून घेतली माघार, 'ब्रह्मास्त्र २'ची तयारी सुरु
8
ऐन दिवाळीत माधुरी दीक्षितला करावं लागलेलं टक्कल, खुद्द 'धकधक गर्ल'ने केला खुलासा
9
"मी मोदींचा भक्त, भाजप म्हणजे घर"; महेश कोठारे म्हणाले, "मुंबईवर कमळ फुलणार, महापौरही इथूनच"
10
पाकिस्तानचे सूर बदलले? शाहबाज यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या; जगभरातील हिंदू असा उल्लेख केला, पण...
11
८०० वर्षांनी वैभव लक्ष्मी-महालक्ष्मी योगात लक्ष्मी पूजन: महत्त्व, महात्म्य, लक्ष्मी आरती
12
दहशत माजवणारा साद रिझवी कुठे गायब झाला? पीएम शहबाज शरीफ यांच्याही आणलेले नाकी नऊ!
13
हृदयस्पर्शी! शाळेच्या लाडक्या दास काकांची ३८ वर्षांची सेवा, वाजवली शेवटची घंटा; पाणावले डोळे
14
"भारताने इस्रायलकडून शिकायला हवे", RSS नेते भैयाजी जोशी नेमकं काय म्हणाले? धर्मांतरणावरही स्पष्टच बोलले!
15
दिवाळीनिमित्त मराठी अभिनेत्रीने पोस्ट केला लेकाचा गोड फोटो; म्हणाली, "माझ्या छोट्या स्टारची..."
16
WhatsApp युजर्सना मोठा धक्का; ChatGPT चा वापर करू देणार नाही मेटा, कारण...
17
"मोठी सती सावित्री बनून फिरतेय, रीलमध्ये फक्त पेटीकोटवर...", तान्या मित्तलची मालतीकडून पोलखोल
18
"आर्यनने त्याच्या दु:खावर सर्वांना हसवलं...", लक्ष्य लालवानीने केलं शाहरुखच्या लेकाचं कौतुक
19
"नगरविकास खाते माझ्याकडे; पैशांचा तुटवडा येणार नाही"; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाण्यात मोठा दावा
20
बांके बिहारी मंदिराच्या १०० वर्षांहून जुन्या 'तळघरात' अखेर काय सापडलं? साडे चार फूट सोन्याची काठी...

गावांतर्गत पिप्रीकरांची आठ कि.मी.पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 12:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : स्वातंत्र्योत्तर भारताचाच एक घटक असलेल्या माकडकुंड ता.धडगाव येथील पिप्री व अटवीपाडा या पाड्यांपर्यंत अपेक्षेनुसार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : स्वातंत्र्योत्तर भारताचाच एक घटक असलेल्या माकडकुंड ता.धडगाव येथील पिप्री व अटवीपाडा या पाड्यांपर्यंत अपेक्षेनुसार रस्ते विकासाची कामे झाली आहे. गावाच्या मुख्य ठिकाणापासून आठ ते नळ किलोमिटर अंतरावरील नागरिकांना प्रशासकीय कामानिमित्त गावाया मुख्य ठिकाणी पोहोचण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.जिल्ह्यातील सर्व गावे व पाडे रस्त्यांनी जोडण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक, वाडीजोड यांच्यासह विविध योजनांच्या माध्यमातून जिल्हांतर्गत रस्त्यांची कामे करण्यात आली. परंतु कात्री ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत अनेक पाडे रस्ते विकासापासून वंचित राहिले आहे. संपूर्ण देशभर वाड्या-वस्त्या जोडण्यासाठी व गाव-पाह्यांना एकमेकांच्या संपर्कात आणण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत असल्या तरी या योजनांचा कात्री ग्रामपंचायतीतील या पाड्यांपर्यंत योजना पोहोचल्याच नाही.रस्ते निर्माण करीत तेथील नागरिकांनाही विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कात्री ग्रामपांचायतीमार्फत ठराव मंजूर करीत शासनस्तरावर वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. परंतु प्रशासन यंत्रणेकडून त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे हा भाग स्वातंत्र्योत्तर अनेक शतके उलटल्यानंतरही व सर्वत्र आधुनिकतेचा अवलंब केला जात असतानाही या पाड्यांवरील नागरिक आजही विकासाच्या प्रवाहापासून वंचित राहिले आहे.या पाड्यांबाबत प्रशासनाच्या उदासिन भूमिकेमुळे नागरिकांच्या नशिबी पायपीटच आली आहे. माकडकुंड ता.धडगाव हे गाव मुख्य ठिकाण, पाटीलपाडा, पिप्रीपाडा, अटवीपाडा यासह अनेक पाड्यांमध्ये विभागले आहे. त्यातील पिप्रीपाडा, ओटवीपाडा हे पाडे माकडकुंडच्या मुख्य ठिकाणापासून आठ व नऊ किलोमिटर अंतरावर आहे. या दोन्ही पाड्यांवर अनेक कुटुंब वास्तव्यास आहे. तेथील नागरिकांचे संपूर्ण प्रशासकीय कामे माकडकुंडच्या मुख्य ठिकाणाहून होतात, या कामांसाठी त्यांना आठ ते नऊ किलोमिटर पायपीट करावी लागते.नर्मदा नदीकाठावरील अनेक गावांपैकी माकडकुंड हे एक सर्वाधिक मोठे गाव आहे. गाव एकच असले तरी त्यातील वाड्या-वस्त्याच जोडल्या गेल्या नाही. त्यामुळे गाव व पाडे जोडण्यासाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत पश्न उपस्थित होत आहे. योजना पोहोचल्याच नाही की, त्याचे अन्य मार्गाने पर्यावसन झाले? असाही मुद्दा कात्री ग्रुप ग्रामपंचायतींतर्गत नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.कात्री ग्रामपंचायत अंतर्गतच वाहवाणी या गावातील नोलदापाडा या ठिकाणाची देखील हीच व्यथा आहे. तेथील नागरिकांना देखील मतदानासारख्या कामासाठी १० ते १२ किलोमिटर पायपीट करावी लागतले.पिप्री व ओटवीपाडा येथील गावाच्या मुख्य ठिकाणी पोहोचण्यासाठी रस्ता आहे. परंतु शेजारिल तालुक्यातून २५ कि.मी. फिरावे लागते. हा फेरा टाळण्यासाठी नऊ कि.मी. पायपीट सुरू आहे.नलदापाडा ते ओटवीपाडा - आठ कि.लोमिटरमाकडकुंड ते बोरी व पाडावपाडा - पाच किलोमिटरकात्री पाडावपाडा ते तोरखापाडा -तीन किलोमिटरकात्री प्रा.आरोग्य केंद्र ते आमलीपाडा- दोन किलोमिटरमाकठकुंड, मानीपाडा ते पिप्रीपाडा - १० किलोमिटरपौला ते नेंड्यापाडा - पाच किलोमिटरप्रा.आरोग्य केंद्र ते गुडापाडा - तीन किलोमिटरपाटीलपाडा (कात्री) ते सेलखेडीपाडा तीन किलोमिटरपाडावपाडा ते तोरखापाडा- दोन किलोमिटरगुडापाडा ते पेरीवदापाडा - दोन किलोमिटरहानीपाडा ते कुंडल- तीन किलोमिटर