शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 11:14 IST

निवडणूक : कायदा व सुव्यवस्थेलाही प्राधान्य, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची माहिती

नंदुरबार : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी पथकांची व विशेष कक्षाचीही स्थापना करण्यात अलाी आहे. निवडणुका शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी मंजुळे यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार उपस्थित होते. निवडणुकीची तयारी, आचारसंहितेची अंमलबजावणी, संवेदनशील मतदान केंद्र यासह विविध बाबीसंदर्भात माहिती देतांना जिल्हाधिकारी मंजुळे यांनी सांगितले, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कालपासून लागू झाली आहे. सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले बॅनर, कटआऊट्स काढण्यासाठी ४८ तासांची मुदत देण्यात आली आहे. शासकीय वाहने, शस्त्रे जमा करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. शिवाय अपर जिल्हाधिकारी यांच्या अधिपत्याखाली आचारसंहिता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक मतदारसंघात भरारी पथक, व्हीडीओ चित्रीकरण पथक, सांख्यिकी पथक नेमण्यात आले आहेत. निवडणुकीत सीव्हीजील अ‍ॅप वापरण्यात येणार असून याद्वारे आचारसंहिता भंगाची तक्रार नागरिकांना करता येणार आहे.निवडणुकीसाठी मतदान यंत्रे देखील पुरेषा प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यात १,९२४ कंट्रोल युनिट, ३,२१९ बॅलेट युनिट, २,०४० व्हीव्हीपॅट मशीन उपलब्ध आहेत. सर्वच मतदान केंद्रात व्हीव्हीपॅट मशीनद्वारेच मतदान घेतले जाणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात एकुण १,३८० मतदान केंद्र असून धुळे जिल्ह्यातील साक्री विधानसभा मतदार संघात ३६५ तर शिरपूर मतदार संघात ३२३ मतदान केंद्र असे एकुण २,०६८ मतदान केंद्र राहणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी दिली. पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी सांगितले, जिल्ह्यात सहा ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. फरारी आणि पाहिजे असलेल्या आरोपींचाही शोध सुरू आहे. १२ जणांचे तडीपारचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. २६० पैकी ११ जणांना नॉन बेलेबल वॉरंट बजावण्यात आले आहे. परवानाधारक शस्त्रे बाळगणाऱ्यांकडून शस्त्रे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यापैकी २३ शस्त्रे जमा करण्यात आली आहेत. दहा वर्षांपासून फरार असलेल्या आरोपींची माहिती दिल्यास संबधीताला दहा हजार रुपये रोख बक्षीस देखील देण्यात येणार असल्याची माहितीही पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी दिली.विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारसंख्या पुढील प्रमाणे : अक्कलकुवा : २,७२,८७२, शहादा : ३,१३,५४६, नंदुरबार : ३,३२,२६१, नवापूर : २,८३,६४७, साक्री : ३,३५,४३९ तर शिरपूर मतदारसंघात ३,१२,५७७ मतदार आहेत. एकुण १८,५०,४४२ मतदारांपैकी पुरुष मतदार ९,३४,२०७ तर महिला मतदार ९,१६,२१३ व २२ इतर मतदार आहेत.