आजाराची लक्षणे
‛साल्मोनेला टायफी’ नावाचा हा विषाणू मानवी शरीरात पसरतो. या रोगाच्या पहिल्या आठवड्यात शरीराचे तापमान हळूहळू वाढते. सोबतच डोकेदुखी, अंगदुखी आणि अस्वस्थता वाटते. काहींना उलट्यांचाही त्रास होतो. या आजाराचे निदान करताना रक्ताची चाचणी म्हणजे ‛विडाल टेस्ट’ पहिल्या आठवड्यात निगेटिव्ह येते. परंतु रोगाच्या दुसऱ्या आठवड्यात ताप वाढतो. आणि १०४ डिग्रीपर्यंत पोहोचतो. रुग्ण बेशुद्ध अवस्थेतही जाऊ शकतो. जुलाबाचाही त्रास होऊ शकतो. याच टप्प्यात करण्यात येणाऱ्या विडाल टेस्टमध्ये रुग्ण पॉझिटिव्ह येतो. रोगाच्या तिसऱ्या आठवड्यात अनेक गुंतागुंत वाढते. पाण्याची मात्रा कमी होते. काही रुग्णांच्या शरीरावर पुरळही येतात. या टप्प्यात रुग्णांच्या प्लेटलेट कमी होतात.
अशी घ्या काळजी
जिल्ह्यात डेंग्यू, मलेरियासोबतच टायफाइड रुग्ण दिसून येत आहेत. बालकांसोबत मोठेही या आजाराने पीडित आहेत. साधारण १०० रुग्णांमधून २० ते २५ रुग्ण आढळून येत आहे. स्वच्छता पाळणे, बाहेरील उघड्यावरील खाद्यपदार्थ टाळणे, गरम आणि ताजे अन्नाचे सेवन करणे, फळ आहाराला महत्त्व देणे, पाणी उकळून व गाळून पिणे हाच यावर उपाय आहे.