शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व भागात कोसळली सुपारीच्या आकाराची ‘गार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 12:06 IST

शनिमांडळ : नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ व बलवंड येथे गारपीटीमुळे कांदा, पपई आणि चवळी पिकांचे नुकसान झाले़ मंगळवारी दुपारी पावणेतीन ...

शनिमांडळ : नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ व बलवंड येथे गारपीटीमुळे कांदा, पपई आणि चवळी पिकांचे नुकसान झाले़ मंगळवारी दुपारी पावणेतीन वाजेपासून पावसाला सुरुवात झाली होती यानंतर काही क्षणातच गारा कोसळण्यास प्रारंभ झाल्याने गावासह शेतशिवारात शेतकऱ्यांची धावपळ उडाली होती़शनिमांडळ, इंद्रीहट्टी, तलवाडे, तिलाली, सोमनाथनगर आणि आखातवाडे परिसरातील शेतीला गारांचा मोठा फटका बसला़ गारपीटीनंतर तलाठी जयेश राजपूत आणि कृषी सहायक आऱपी़ हिरे यांनी तातडीने पंचनामे सुरु केले़ प्रारंभी झालेल्या पंचनाम्यात पंकज यादव होंडगर यांच्या शेतातील तीन एकर पपई, शंकर लुका महाजन यांची भाजीपाला, भाईदास राम धनगर यांची पपई, विजय यादव होंडगर यांच्या शेतातील चवळी, खंडू यादव होंडगर, सुका यादव होंडगर, विजय होंडगर यांच्या शेतातील कादां आणि चवळीचे पीक निकामी झाले़ रात्री उशिरापर्यंत शनिमांडळ परिसरात पंचनामे करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली़ दुपारी कोसळलेल्या गारांच्या पावसामुळे शनिमांडळ परिसरात ठिकठिकाणी गारांचा खच साचला होता़ अवकाळी अशा या पावसानंतर या भागात प्रचंड उकाडा जाणवण्यास प्रारंभ झाला होता़ शेतशिवारातील जनावरेही गारपिटीत सापडल्याची माहिती असून एक-दोन ठिकाणी जनावरे जखमी झाल्याचे सांगण्यात येत होते़ सायंकाळनंतर पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने चिंता निर्माण झाली होती़दरम्यान बलंवड येथे मुसळधार पावसासह गारपीट झाली़ दुपारी अडीच वाजेच्या सुमारास आलेल्या पावसामुळे शेतशिवातील बागायती आणि भाजीपाला पिकांचे नुसान झाले़ बलवंड गावापासून दोन किलोमीटर अंतरावर सुरु असलेल्या रजाळे येथील देवीच्या यात्रोत्सवावर परिणाम झाला़ वेगवान वारे आणि पाऊस यामुळे व्यावसायिकांनी टाकलेले तंबू उडून गेले होते़ बलवंड येथे गेल्या दोन दिवसांपासून पाऊस कोसळत असून मंगळवारी पहाटेच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली होती़ पावसामुळे गावातील गटारी तुडूंब भरुन वाहू लागल्या होत्या तर रस्त्यांवरही पाणी होते़