लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दिनदयाल ग्राम ज्योती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 14 हजार 700 वीज ग्राहकांना लाभ मिळाला आहे. या योजनेसाठी वीज वितरण कंपनीने जिल्ह्याला 40 कोटी 26 लाख रुपये निधी मंजुर झाला आहे.जिल्ह्याला सन 2030 र्पयत लागणा:या विजेचा आराखडा तयार करून त्यानुसार काम सुरू करण्यात आले आहे. त्याअंतर्गतच दिनदयाल ग्राम ज्योती योजनेचेही काम सुरू करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत 40 कोटी 26 लाख रुपये निधीतून कामे करण्यात येत आहेत. याअंतर्गत गावठाण फिडर विलगीकरणाचे 34 प्रस्ताव आहेत. ही कामे प्रगतीपथावर आहेत. 33 के.व्ही.उपकेंद्र चार असून त्यांचीही कामे सुरू करण्यात आली आहेत. याअंतर्गत एकुण 14 हजार 700 ग्राहकांना त्याचा फायदा मिळणार आहे.राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे दोन महिन्यांपूर्वी नंदुरबारात आले असता त्यांनी या कामांचा आढावा घेवून अधिका:यांना सुचना केल्या होत्या.
दिनदयाल ग्राम ज्योती योजनेचा नंदुरबारातील 14 हजार ग्राहकांना फायदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 18:15 IST