लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दिवसभरात तब्बल २१९ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. एकाच दिवसात एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण करोनामुक्त झाल्याने उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या महिनाभरानंतर प्रथमच हजाराच्या आत आली आहे. सद्या ८७८ रुग्ण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात दररोज ५० ते १०० च्या संख्येने कोरोनाबाधीत आढळून येत आहे. त्यामुळे संख्या पाच हजाराच्या घरात गेली आहे. दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या कमी राहत असल्यामुळे अॅक्टीव्ह रुग्ण संख्या तब्बल १३०० ते १४०० पर्यंत पोहचली होती. परिणामी बेड मिळणे जिकरीचे ठरत आहे. असे असतांना गुरुवार मात्र जिल्हा वासीयांसाठी समाधानकारक ठरला. दिवसभरात तब्बल २१९ जण कोरोनामुक्त झाले. सद्या कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या आता तीन हजार ७५६ झाली आहे.गुरुवारी कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये नंदुरबार तालुक्यातील ७३, शहादा तालुक्यातील ७७, नवापूर तालुक्यातील १९, तळोदा तालुक्यातील २१, अक्कलकुवा तालुक्यातील २३, जिल्हाबाहेरील सहा असे एकुण २१९ जणांचा समावेश आहे.दरम्यान, नंदुरबार तालुक्यात आतापर्यंत १,५२४, शहादा तालुक्यात १,२८९, तळोदा तालुक्यात ३९४, नवापूर तालुक्यात ३३३, अक्कलकुवा तालुक्यात ९६ तर धडगाव तालुक्यात १३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
दिवसभरात २१९ जण झाले कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 12:58 IST