शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

शेणा-मातीच्या धूप दिव्यांचा मंत्रालयात दरवळ, आदिवासी महिलांना मिळाले मेहनतीचे फळ

By भूषण.विजय.रामराजे | Updated: November 11, 2023 06:10 IST

आदिवासी विकास विभाग आणि महिला आर्थिक विकास मंडळाच्या प्रयत्नाने वाण्याविहीर येथील बचत गटांच्या ४४ महिला सदस्यांनी शेणा-मातीपासून दिवे तयार करण्याचा हा अभिनव व्यवसाय सुरू केला आहे.

नंदुरबार : नंदुरबारच्या महिलांनी तयार केलेल्या धूप, दिवे आणि पणत्यांनी मुंबई मंत्रालयातील अधिकाऱ्यांनाही भुरळ घातली आहे. मंत्रालयात नुकत्याच झालेल्या नवतेजस्विनी दिवाळी मेळावा प्रदर्शनात शेणा-मातीपासून तयार केलेले दिवे, पणत्या हाताेहात विक्री झाल्याने जिल्ह्यातील आदिवासी महिलांना रोजगाराचा नवा मार्ग सापडला आहे.  गेल्या काही काळात लाख रुपयांपर्यंतची उलाढाल करण्यात आली आहे.

आदिवासी विकास विभाग आणि महिला आर्थिक विकास मंडळाच्या प्रयत्नाने वाण्याविहीर येथील बचत गटांच्या ४४ महिला सदस्यांनी शेणा-मातीपासून दिवे तयार करण्याचा हा अभिनव व्यवसाय सुरू केला आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाकडून शेणापासून दिवे व इतर साहित्य तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले होते. बचत गटाच्या गेंदुबाई वळवी आणि ज्योती गेंबू वळवी यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम सुरू झाला होता.

पशुसंवर्धन व दुग्धोत्पादन याबाबत महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक कांतागाैरी बनकर यांनी सांगितले की, आदिवासी महिलांना मिळालेला हा मार्ग जिल्ह्यातून होणारे स्थलांतर रोखू शकतो.हा प्रयोग इतरही गटांमध्ये राबवण्यात येणार आहे. यातून पशुधन संवर्धन आणि दुग्धोत्पादन असे दुहेरी यश मिळणार आहे.

देशभर वितरणाची तयारीमहिला आर्थिक विकास महामंडळाकडे बंगळुरू येथील एका कंपनीने प्रगती बचत गटाच्या महिलांना प्रशिक्षण देण्याचे निश्चित केले आहे. यानुसार, त्यांना पॅकेजिंग आणि लेबलिंगचे प्रशिक्षण देऊन वितरणही ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहेत. 

टॅग्स :Diwaliदिवाळी 2023