शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या तापमानामुळे नंदुरबारातील जनजीवनावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 12:16 IST

असह्य ऊन व उकाडय़ाने हैराण

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 28 : यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वोच्च तापमानाची नोंद मंगळवार, 27 मार्च रोजी करण्यात आली. मंगळवारचे कमाल तापमान 40.2 तर किमान 21.3 सेल्सीयस नोंदले गेले. वाढत्या तापमानामुळे जनजिवनावर परिणाम झाला आहे. मंगळवारी बाजाराचा दिवस असूनही बाजारात दुपारी फारशी गर्दी दिसून आली नाही.गेल्या चार ते पाच दिवसांपासून तापमानाचा पारा वाढतच आहे. गेल्या दोन दिवसात दीड ते दोन सेल्सीयस तापमानाची वाढ झाली आहे. सरासरी तापमाना 38 ते 39 अंशार्पयत कायम होते. मंगळवारी मात्र तापमान थेट 40 च्यावर गेले. दुपारी दोन वाजता तापमानाची नोंद 40.2 इतकी नोंदली गेली. यंदाच्या उन्हाळ्यातील ही सर्वोच्च नोंद असल्याचे प्रशासनाचे म्हणने आहे. प्रशासनासह जिल्ह्यातील दोन्ही कृषी महाविद्यालय आणि कृषी विज्ञान केंद्रात देखील तापमानाचा आकडा 40 नोंदला गेला आहे. नंदुरबार जिल्ह्यात शासकीय तापमानाची आकडेवारी आपत्ती निवारण केंद्रातर्फे घेतली जाते. याशिवाय नंदुरबारातील हवामानाचे उपकरण थेट उपग्रहाने पुणे वेधशाळेशी देखील जोडले गेले आहेत. त्यांच्या आकडेवारीत देखील 40 हा आकडा नोंदला गेला आहे.जनजिवनावर परिणामवाढत्या तापमानामुळे जनजिवनावर देखील परिणाम होत आहे. विविध आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. ताप, डोकेदुखी, अंगदुखी या आजारांच्या रुग्णांमध्ये गेल्या चार ते पाच दिवसांपासून वाढ झाली असल्याचे जिल्हा रुग्णालय आणि खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी स्पष्ट केले. त्यामुळे उन्हापासून बचावासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे.उष्माघात कक्षाची संकल्पना कालबाह्यजिल्हा रुग्णालयांमधील उष्माघात कक्षांची संकल्पना कालबाह्य झाली आहे. जिल्हा रुग्णालयातील जवळपास सर्वच महत्वाचे वॉर्ड हे वातानुकुलीत करण्यात आलेले आहेत. त्यामुळे वेगळ्या अशा कक्षाची गरज नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आर.डी.भोये यांनी स्पष्ट केले. असे असले तरी उपजिल्हा रुग्णालये, ग्रामिण रुग्णालये या ठिकाणी असे कक्ष सज्ज ठेवण्याच्या सुचना याआधीच देण्यात आलेल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.दरम्यान, वाढत्या तापमानामुळे गारवा देणा:या पदार्थाना देखील मागणी वाढली आहे. रसदार फळांना मोठी मागणी आहे.