शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

‘निसर्ग’मुळे जिल्हाभरात पाणीच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 11:26 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे जिल्हाभरात बुधवार सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाली होती. काही भागात मध्यम स्वरूपाचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे जिल्हाभरात बुधवार सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाली होती. काही भागात मध्यम स्वरूपाचा तर काही भागात तीव्र स्वरूपाचा पाऊस सुरू होता. सायंकाळपर्यंत वाऱ्याचा वेग ताशी २५ ते ३० किलोमिटर होता. नंतर मात्र वाºयाचा वेग देखील वाढला. बुधवारी दुपारी ३ वाजेपासून जिल्हाभरातील बाजारपेठा बंद करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. गुरुवार दुपारपर्यंत चक्री वादळाचा आसर राहणार असल्यामुळे गावागावात दवंडी देवून नागरिकांना सतर्क करण्यात आले. पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांनी नागरिकांना सतर्कतेच्या सुचना देवून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.बुधवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाली होती. दुपारी १२ वाजेनंतर पावसाचे स्वरूप मध्यम ते तीव्र स्वरूपाचे झाले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ते कायम होते. नंतर मात्र पावसाने विश्राती घेतली. पाऊस थांबल्यानंतर सोसाट्याचा वारा वाहू लागला. ताशी ३० ते ४० किलोमिटर असा त्याचा वेग होता. चक्रवादळ जसे जवळ येईल तसा त्याचा वेग वाढणार असल्याचा अंदाजही वर्तविला जात होता. मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या झालेल्या पावसामुळे मात्र शहरी भागातील अनेक भागात पाणी साचले होेते. घरांचे छत देखील गळू लागले होते.प्रशासन सतर्क‘निसर्ग’चक्रीवादळ हे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडकल्यानंतर जिल्ह्यातदेखील गुरुवार सकाळपर्यंत पाऊस, अतिवृष्टी, तसेच जोराचे वादळवारे वाहण्याची शक्यता असल्याने प्रशासनाला आवश्यक उपाययोजना राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले. त्या अनुषंगाने तालुकास्तरावर बैठका, गावागावात दंवडी देणे, पूर रेषेतील नागरिकांना सुरक्षीत स्थळी हलविण्याचे काम बुधवार सायंकाळपर्यंत करण्यात आले होते.शासकीय अधिकारी व कार्यालये तसेच नागरिकांना विविध निर्देश देवून सतर्क करण्यात आले. शासकीय कार्यालयाकरीता निर्देशानुसार तालुक्यातील सर्व तहसिल कार्यालयात मध्यवर्ती नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले. या कक्षात महसूल, नगरपालिका, नगरपंचायत, पोलीस, आरोग्य, विज वितरण, कृषी विभागातील कर्मचाºयाची नियुक्ती करण्यात आली. नियंत्रण कक्षातून तालुक्यातील सर्व तलाठी, ग्रामसेवक, मंडल अधिकारी, कृषीसेवक यांच्याशी वेळोवेळी संपर्क करण्यात येत होता. गावातील स्थितीचा आढावा घेण्यात येत आहे. याबाबत जिल्हा नियंत्रण कक्षाला (दूरध्वनी क्रमांक ०२५६४-२१०००६) अहवाल सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व आपात्कालीन यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात आली.ग्रामस्थांना हलविण्यासाठी सज्जजिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेतील सर्व अधिकारी, कर्मचारी यांना मुख्यालयाच्या ठिकाणी उपस्थित राहावे. सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी परवानगी शिवाय आपले मुख्यालय सोडू नये. आरोग्य विभागातील ग्रामिण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रामधील सर्व डॉक्टर्स, नर्सेस आजपासून पुढील २४ तास कार्यरत राहतील. सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी वादळामुळे जिल्ह्यातील रस्ता खचणे,दरी कोसळणे व इतर अनुषंगीक घटनांची तात्काळ दखल घेऊन त्याबाबत त्वरीत उपाययोजना कराव्यात.महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने वादळामुळे इलेक्ट्रीक पोल पडणे, व त्यावरील तारा तुटणे व इतर अनुषंगीक घटना लक्षात घेता तात्काळ उपाययोजना कराव्यात. चक्रीवादळादरम्यान मुख्य विद्युत जोडणी बंद करण्यात यावीत. संपर्क साधतांना अडचण येऊ नये म्हणून सर्व अधिकारी,कर्मचारी यांनी आपले भ्रमणध्वनी चार्ज करुन ठेवावे.नागरिकांना आवाहननागरिकांना देखील आवाहन करण्यात आले होते. पाऊस व जोराचे वादळवारे होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये. विशेषत: जुने घर, पत्र्याचे घर, कच्चे घर किंवा घर पडण्याचा धोका असलेल्या घरामधील राहणाºया नागरिकांनी सतर्कता म्हणून आपल्या जवळच्या सामाजिक सभागृहात, शाळेत किंवा समाज मंदीरात तात्पुरता आसरा घ्यावा. शेतकऱ्यांनी आपले जनावरे झाडाखाली बांधू नये ते सुरक्षित ठिकाणी बांधावीत. नदी, नाले ,विद्युत पोल,तारा,जुने वृक्ष यापासून दूर रहावे.स्वत:जवळ पिण्याचे पाणी, औषधे, काडीपेटी, दिवा असे साहित्य बाळगावे. संकटकालीन परिस्थितीत ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी सेवक, गटविकास अधिकारी व तहसिलदार यांच्याशी संपर्क साधावा. सर्व दुकानदारांनी बुधवारी दुपारी ३ वाजेनंतर दुकाने बंद केली होती. गुरुवारी परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात येणार आहे.नागरिकांनी समाज माध्यमांवर कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नये व अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रशासनाच्या सूचनाचे पालन करावे आणि अधिकृत माहितीसाठी प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हाधिकाºयांनी केले आहे.

तालुक्यातील असुरक्षित घरांचा आढावा घेऊन तेथील नागरिकांना तात्काळ समाजमंदीर, शाळा किंवा गावातील सुरक्षीत ठिकाणी हलविण्यात आले. नगरपालिका, नगरपंचायत तसेच गावामध्ये खबरदारी म्हणून घंटागाडी, दवंडीद्वारे, सोशल मिडीयाद्वारे नागरिकांना चक्रीवादळाच्या दृष्टीने सुरक्षेबाबत अवगत केले गेले.४कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या वेळी जनजागृतीसाठी दोन महिन्यांपूर्वी दवंडीचा वापर करण्यात आला होता. आता पुन्हा चक्री वादळासाठी दवंडीचा उपयोग करण्यात आला. समाज माध्यमांची सध्या चलती असतांनाही दवंडीचा प्रयोग गावागावात करण्यात आला.

पालकमंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा

ांदुरबार : जिल्ह्यातील नागरिकांनी विशेष दक्षता बाळगावी आणि घरातच रहावे, बाहेर पडू नये असे आवाहन पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी केले आहे. दरम्यान, त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून एकुण परिस्थितीचा व तयारीचा आढावा घेतला.हवामान विभागाच्या माहितीनुसार वादळाचा प्रवास नंदुरबार जिल्ह्यातून मध्य प्रदेशाकडे होण्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने नागरिकांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. विशेषत: जुने घर, पत्र्याचे घर, कच्चे घर किंवा घर पडण्याचा धोका असलेल्या घरामधील राहणाºया नागरिकांनी सतर्कता म्हणून आपल्या जवळच्या सामाजिक सभागृहात, शाळेत किंवा समाज मंदीरात तात्पुरता आसरा घ्यावा.शेतकऱ्यांनी आपले जनावरे झाडाखाली बांधु नये ते सुरक्षित ठिकाणी बांधावी. नदी, नाले यापासून दूर रहावे. जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे पथक यासाठी सज्ज आहे.जर एखादी दुर्घटना घडली तर त्वरीत ग्रामसेवक, तलाठी, गट विकास अधिकारी किंवा तहसिलदारांशी संपर्क साधावा जेणेकरुन त्वरीत मदत पोहचविणे शक्य होईल. नागरिकांनी काळजी करु नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रशासनाच्या सूचना पाळाव्यात असे आवाहनही त्यांनी केले.