शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ले करण्याच्या तयारीत; अमेरिकन गुप्तचरांच्या दाव्याने खळबळ
2
मोठा खुलासा! हेर तारिफने दिलेल्या माहितीवरूनच पाकिस्तानने सिरसावर डागले होते क्षेपणास्त्र
3
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
4
Operation Sindoor : सुवर्ण मंदिरात एअर डिफेन्स गन तैनात केली होती? भारतीय सैन्याने दिली माहिती
5
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
6
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
7
मुसळधारेने दाणादाण,  राज्यात वीज पडून ४ ठार; मान्सूनपूर्व वादळी पावसाने राज्याला झोडपले
8
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
9
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
10
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
11
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
12
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
13
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
14
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
15
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
16
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
17
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
18
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
19
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड

गोठय़ांचा निधी नसल्याने जनावरांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 12:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतून मंजूर करण्यात आलेले 200 जनावरांचे गोठे निधीअभावी रखडले  आहे.   ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतून मंजूर करण्यात आलेले 200 जनावरांचे गोठे निधीअभावी रखडले  आहे.   या लाभाथ्र्याना आपली जनावरे यंदाही उन, वारा व पावसातच उभी करावी लागणार आहे. निधीबाबत वरिष्ठ प्रशासनाने गंभीर दखल घेऊन तातडीने उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी तळोदा तालुक्यातील आदिवासी लाभाथ्र्यानी केली आहे.ग्रामीण भागातील गरीब पशुपालकांची महागडे जनावरांचे उन, वारा, पाऊस अशा नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण करण्ण्यासाठी राज्य शासनाच्या रोजगार हमी योजनेतून गोठय़ांची योजना गेल्या दोन वर्षापासून सुरू करण्यात आलेली आहे. संबंधीत गावांच्या ग्रामपंचायतीमार्फत ही योजना राबवायची असते. या योजनेतून अकुशल व गुराळ अशा दोन्ही प्रकारच्या लाभाथ्र्याना यातून           रोजगार मिळणार आहे. साधारण 70 हजार रुपये एका गोठय़ास अनुदान आहे. यात अकुशल लाभार्थीस 12 हजार रुपये तर गोठा मालकास 58 हजार रुपयांचे अनुदान दिले जात असते. या योजनेतून तळोदा तालुक्यात ही साधारण 275 गोठे मंजूर करण्यात आले आहे. तथापि, निधीअभावी सध्या तरी ही योजना रखडली आहे.वास्तविक या योजनेतून अकुशल कामगारांना रोजगार हमीतून राजगार उपलब्ध होण्या बरोबरच गरीब आदिवासी पशुपालकाच्या जनावरांचेही संरक्षण होऊ शकते. परंतु निधीबाबत या विभागातील वरिष्ठ प्रशासनाने उदासिन भूमिका घेतल्याचा आरोप लाभाथ्र्यानी केला आहे. पंचायत समितीने प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीस पाच गोठे मंजूर केले आहेत. त्यानुसार साधारण 75 लाभाथ्र्यानी उधार, उसनवारी व आपल्या खिशातून पैसे टाकून गोठे बांधलेली आहेत. या गोठय़ाच्या बांधकामाची प्रत्यक्ष जागेवर जावून पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या अधिका:यांनी मोजमाप करून तशी माहिती सहा  महिन्यांपूर्वीच रोजगार हमी योजना विभागाकडे पाठविली आहे. अशी वस्तुस्थिती असताना संबंधित        यंत्रणेने गोठे मालकांना अजूनपावेतो अनुदान उपलब्ध करून दिलेले        नाही. पंचायत समितीनेदेखील जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करत निधीची मागणी केली आहे. परंतु वरूनच निधी मिळत नसल्याचे सांगण्यात आले आहे. इकडे संबंधीत लाभार्थीने सावकाराकडून व्याजाने पैसे काढल्यामुळे त्यांचे पैसे देण्यासाठी पंचायत समितीकडे सातत्याने हेलपाटे मारत आहे. मात्र रक्कम आली नसल्याचे उत्तर प्रशासनाकडून मिळत असल्याने निराश होऊन परत जावे लागत असल्याची व्यथा त्यांनी बोलून दाखविली. शासनाने या योजनेतून अकुशल कामगाराची मंजुरी अदा केली आहे. परंतु कुशल लाभाथ्र्यास त्याचा अनुदानापासून वंचित ठेवत आहे. प्रशासनाच्या अशा दुजाभावाच्या धोरणाबाबत लाभाथ्र्यानी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गोठय़ांची थकीत रक्कमेबाबत पंचायत समितीच्या अधिका:यांनाही लाभाथ्र्याचा रोष पत्करावा लागत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणी वरिष्ठ प्रशासनाने तातडीने दखल घेऊन या योजनेचे अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा आहे.