शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
5
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
6
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
7
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
8
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
9
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
12
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
13
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
14
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
15
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
16
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
17
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
18
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
19
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
20
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर

महामार्गामुळे विकासाला मिळेल चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 12:11 IST

शेवाळी-नेत्रंग महामार्ग : हालचाली गतिमान, जमिन संपादन लवकरच होणार

ठळक मुद्दे नंदुरबार शहराला लाभ.. प्रस्तावीत महामार्ग नंदुरबारातून जाणार आहे. सध्या असलेल्या वळण रस्याचे चौपदरीकरण अपेक्षीत आहे. वास्तविक शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता शहराबाहेरून हा महामार्ग काढावा अशी मागणी आहे. परंतु त्यासाठी खाजगी जागा संपादीत करावी लागणार अ

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शेवाळी ते नेत्रंग या जवळपास साडेचारशे किलोमिटर महामार्गाच्या कामासाठे हालचाली सुरू झाल्या आहेत. लवकरच राज्याच्या हद्दीतील रस्त्यासाठी जमिन संपादनाच्या कामाला सुरुवात होणार आहे. दरम्यान या महामार्गामुळे सुरत-नागपूर महामार्ग ते गुजरातधील एक्सप्रेसवे जोडले जाणार आहेत.सुरत-नागपूर महामार्गावरील साक्री तालुक्यातील शेवाळी फाटय़ापासून ते गुजरातमधील नेत्रंग गावार्पयत हा नवीन राष्ट्रीय महामार्ग राहणार आहे. महाराष्ट्र व गुजरातमधील दुर्गम भाग जोडले जावे हा त्यामागचा उद्देश आहे. या महामार्गाला वर्षभरापूर्वी केंद्रीय भुपृष्ट वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली होती. सहा महिन्यापूर्वी हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग देखील करण्यात आला आहे. त्याची देखभाल व दुरूस्तीचे काम सध्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फतच सुरू आहे. आता या महामार्गासाठी जमिन संपादनाच्या हालचालींना वेग आला आहे. त्यादृष्टीने धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील गावांमध्ये जनसुनवाई घेण्यात येणार आहे.असा असेल महामार्गहा प्रस्तावीत महामार्ग शेवाळी फाटय़ापासून सुरू होऊन धुळे जिल्ह्यातील निजामपूर, छडवेल, नंदुरबार, हातोडापूल मार्गे तळोदा, अक्कलकुवा, खापरमार्गे गुजरात हद्दीत प्रवेश करणार आहे. गुजरातमध्ये राजपिपला, डेडीयापाडा व नेत्रंग येथे हा महामार्ग संपणार आहे. नेत्रंग येथून जाणा:या प्रस्तावित एक्सप्रेसवेला तो जोडला जाणार आहे. यामुळे नाशिक, धुळे, जळगाव भागाकडून अहमदाबाद, राजस्थानकडे जाणा:या मालवाहू वाहनांसाठी हा महामार्ग अत्यंत सोयीचा ठरणार आहे. दुर्गम भाग जोडला जाईलया महामार्गामुळे धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागासह गुजरातमधील दुर्गम भाग देखील जोडला जाणार आहे. दोन्ही राज्यांच्या सिमेवरील हा भाग दुर्गम व आदिवासी समजला जातो. या भागाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या महामार्गाचा मोठा उपयोग ठरणार आहे. धुळे येथील एमआयडीसी आणि नंदुरबारातील प्रस्तावीत एमआयडीसीमधील उत्पादीत माल देखील या मार्गाने गुजरात, राजस्थानमार्गे दिल्लीर्पयत पोहचविला जाऊ शकणार आहे. याशिवाय या महामार्गानेच थेट नागपूर, मुंबई आणि सुरत देखील जोडले जाणार असल्यामुळे दळणवळणाच्या दृष्टीने हा महामार्ग अत्यंत सोयीचा ठरणार आहे. जिल्ह्यातून जाणा:या एकुण महामार्गाच्या लांबीनुसार त्या त्या भागात जमीन संपादन करावी लागणार आहे. त्यासाठी जिल्हाधिका:यांच्या उपस्थितीत 31 ऑगस्ट रोजी जनसुनवणी देखील आयोजित करण्यात आली आहे. नवीन दरानुसार शेतक:यांना जमिनींचा मोबदला मिळतो किंवा कसा याकडे देखील आता लक्ष लागून आहे