शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

कर्मचारी संपामुळे नंदुरबारातील शासकीय संकुल पडले ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 18:20 IST

अडीच हजार कर्मचा:यांकडून कामबंद : महसूल कर्मचा:यांचा तीन दिवसीय संप

नंदुरबार : जिल्हा परिषदेतील तब्बल 449 ,जिल्हा परिषदेतील दीड हजार तसेच शासकीय विभागातील 500 अशा अडीच हजार कर्मचा:यांनी संपात सहभाग घेतल्याने जिल्ह्यातील प्रशासकीय संकुले ओस पडली होती़ कर्मचा:यांनी सकाळी कामबंद करत कार्यालयांच्या प्रवेशद्वारांवर धरणे देत मागण्यांचा एल्गार केला़  राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राजपत्रित महासंघ, तलाठी महासंघ, राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन यांनी सातव्या वेतन आयोगाला लागू करण्याच्या प्रमुख मागणीसह प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारला आह़े तीन दिवसीय संपाच्या पहिल्याच दिवशी कामकाज ठप्प झाल्याचे दिसून आल़े संपात वाहनचालकही सहभागी झाल्याने प्रशासनातील सर्वच अधिकारी पायी किंवा त्यांच्या खाजगी वाहनाने कार्यालयार्पयत आले होत़े आरोग्य कर्मचा:यांनी संपाला पाठिंबा देत कामकाज सुरू ठेवल्याने आरोग्य सेवेवर पडणारा ताण कमी झाला़ शाळा आणि महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारीतसेच वीज कर्मचा:यांनी पत्रक काढून संपाला पाठिंबा देत कामकाज सुरू ठेवले होत़े महसूल विभाग आणि जिल्हा परिषदेच्या लिपिकवर्गीय कर्मचा:यांनी मात्र या राज्यव्यापी संपात 100 टक्के सहभाग दिल्याने कार्यालयांमधील कामकाज होऊ शकलेले नाही़ कंत्राटी कर्मचा:यांवर यातून भार वाढला होता़ महसूल विभागातील 555 पैकी 449 अधिकारी आणि कर्मचारी यांनी संपात सहभाग घेतला़ यात जिल्हाधिकारी कार्यालयातील 100 पैकी 70, उपविभागीय कार्यालय नंदुरबार येथील 12 पैकी 10, शहादा उपविभागीय कार्यालयाचे 9 पैकी 4, तळोदा उपविभागीय कार्यालयातील 13 पैकी 11 अशा 34 पैकी 25 कर्मचा:यांनी संपात सहभाग नोंदवला़ नंदुरबार तहसीलच्या 90 पैकी 79, नवापूर  67 पैकी 60, शहादा 100 पैकी 78, तळोदा 60 पैकी 58, अक्कलकुवा 65 पैकी 44 तर धडगाव तहसील कार्यालयातील 39 पैकी  35 अशा एकूण 354 कर्मचा:यांनी संपात सहभाग नोंदवला होता़ महसूल विभागातील 555 पैकी केवळ 93 अधिकारी आणि कर्मचारी कामांवर हजर होत़े संपकरी कर्मचा:यांनी कार्यालयीन वेळेत त्या-त्या ठिकाणी टाकलेल्या मंडपात बसून निदर्शने करत धरणे दिल़े याशिवाय जिल्ह्यात 11 कर्मचारी अधिकारी कर्मचारी पूर्व परवानगीने रजेवर असल्याने त्यांचा संपातील सहभाग टळला़ नंदुरबार जिल्हा परिषदेंतर्गत विविध विभाग आणि संवर्गात 6 हजार 203 अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती़ यातील 57 जण हे पूर्वपरवानगीने रजेवर होत़े तर संपात हजार 1 हजार 505 अधिकारी कर्मचा:यांनी सहभाग नोंदवला होता़ शहादा, तळोदा, नवापूर, नंदुरबार, अक्कलकुवा आणि धडगाव येथील पंचायत समितीत तब्बल 4 हजार 641 अधिकारी व कर्मचारी यांची कामावर हजेरी होती़ संपाची माहिती नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांचे हाल झाल़े